महाराष्ट्रातील दुष्काळ आणि दुष्काळमुक्ती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आपण गेल्या पाच वर्षापासून दुष्काळाचा सामना करत आहोत. अनियमित पर्जन्य, उन्हाळा आणि थंडी हे वातावरणातील बदल महाराष्ट्रात सुरू झाल्याचे सुचवते. अगोदरच 80% पेक्षा जास्त भूभाग हा बेसाल्ट या काळ्या पाषाणाचा आहे. यामुळे पाणी मुरण्यासाठी मर्यादा आणि वरून पाऊस कमी, हे कमी म्हणून कि काय गेल्या दहा वर्षात सिंचनासाठी वीजपुरवठ्याचा झालेला विस्तार हे देखील दुष्काळाचे एक कारण आहे. आता गरज आहे टी जल पुनर्भरणाची आणि सोबत पाण्याच्या वापराचे व्यवस्थापन करण्याची.