महायान महापरिनिर्वाण सूत्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पाली साहित्यातील सुत्तासाठी महापरिनिब्बाण सुत्त पहा.

निर्वाण सूत्र किंवा महपरिनिर्वाण सूत्र (चिनी: Nièpán Jīng (涅槃經); जपानी: Nehankyō (涅槃経); तिबेटी प्रमाणभाषा: myang 'das kyi mdo) हे महायान बौद्धमताच्या प्रमुख सूत्रांपैकी एक आहे. बौद्ध धर्मसाहित्यातील पाली भाषेतील महापरिनिब्बान सुत्ताशी त्याचे नामसाधर्म्य असले तरी स्वरूप व घटकांच्या बाबतीत या दोहोंमध्ये मोठे फरक आहेत. म्हणूनच नेहमी त्याचा निर्देश महायान महापरिनिर्वाण महा-सूत्र असा किंवा सुटसुटीतपणे "निर्वाण सूत्र" असा केला जातो.