महागणपती (रांजणगाव)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रांजणगाव गणपती मंदिर

महागणपती (रांजणगाव) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे.अष्टविनायकातील सर्वांत शेवटचा गणपती(की चौथा?) म्हणून रांजणगावचा महागणपती ओळखला जातो. 250px|right|thumb|महागणपती (रांजणगाव)

आख्यायिका[संपादन]

त्रिपूरासुर राक्षसाचा वध करण्यापूर्वी शंकराने गणपतीची येथे पूजा केली होती. हे मंदिर शंकराने बांधले असून त्याने उभारलेल्या गावाला मणिपूर असे नाव दिले.

इतिहास[संपादन]

या मं‍दिराचे बांधकाम नवव्या व दहाव्या शतकातील आहे. श्रीमंत माधवराव पेशवे नेहमी या मंदिराला भेट द्यायला यायचे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती आहे. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.

मंदिरात इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे, व गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे साहाय्य दिले आहे. माधवराव पेशव्यांनीच या मूर्तीसाठी तळघर बांधले.

मंदिर[संपादन]

येथील मूळ मूर्ती सध्याच्या मूर्तीच्या मागे(की तळघरात?) असल्याचे सांगितले जाते. तिला मोहोत्कट असे म्हटले जाते. या मंदिराचे बांधकाम वैशिष्ट्यपूर्ण आहे. रांजणगावच्या गणपतीचे मंदिर पूर्वाभिमुख असून, मंदिरात दिशासाधन केले आहे. उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतील, अशी मंदिराची रचना आहे. त्यामुळे उत्तरायणात, दक्षिणायनात व माध्यान्हकाळी गणेशाच्या मूर्तीवर सूर्यकिरणे पडतात. मंदिरातील गणपतीची मूर्ती पूर्वाभिमुख, डाव्या सोंडेची, मोठ्या कपाळाची व आसनमांडी घातलेली आहे. मूर्ती अत्यंत मोहक असून दोन्ही बाजूला ऋद्धि-सिद्धी उभ्या आहेत. दरवाजापाशी जय व विजय हे दोघे रक्षक आहेत. गणेश चतुर्थीच्या दोन दिवस आधी व त्या दिवशी या ठिकाणी मुक्त प्रवेश असतो.

भौगोलिक[संपादन]

पुणे-अहमदनगर रस्त्यावर व पुण्यापासून ५० किलोमीटरवर रांजणगाव येथे हे देऊळ आहे.

बाहेरील लिंक 

रांजणगाव महागणपती पूर्ण विडिओ नाक्कीची पहा MAHAGANPATI RANJANGAON ASHTVINAYAK 2017

अष्टविनायक Ganesh.JPG
मोरेश्वरसिद्धिविनायकबल्लाळेश्वरवरदविनायकगिरिजात्मजचिंतामणीविघ्नहरमहागणपती