Jump to content

मराठा वीरांच्या समाध्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छत्रपती शिवाजी भोसले घराण्यातील स्री-पुरुषांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासातील अनेकांच्या समाध्या महाराष्ट्रात, गुजरातेत, कर्नाटकात व मध्य प्रदेशात आहेत. त्या समाध्यांची ही (अपूर्ण) यादी : 
  1. अण्णाजी दत्तो - सुधागड जि. रायगड
  2. छत्रपती अप्पासाहेब भोसले (नागपूरकर) - माहुली संगम जि. सातारा
  3. अहिल्याबाई होळकर - महेश्वर (मध्यप्रदेश)
  4. आढळराव डोहर (धुमाळ देशमुख) - भाटघर ता.भोर जि.पुणे
  5. आनंदराव धुळप - विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
  6. उदाजी चव्हाण - अणदूर जि. उस्मानाबाद
  7. उमाबाई दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
  8. कवी कलश - तुळापूर जि. पुणे (की वढू बुद्रक येथे?)
  9. कान्होजी आंग्रे - अलिबाग जि. रायगड
  10. कान्होजी जेधे - आंबवडे ता. भोर जि. पुणे
  11. कृष्णाजीराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
  12. कोयाजी बांदल - नेकलेस पॉईंट, ता. भोर
  13. खंडेराव दाभाडे - तळेगाव दाभाडे जि. पुणे
  14. गोदाजी जगताप - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
  15. चिमाजी अप्पा - शनिवारवाडा जि. पुणे
  16. जानोजी भोसले - नागपूर
  17. जिजाबाई भोसले - पाचाड जि. रायगड
  18. जिवा महाला - आंबवडे ता. भोर जि. पुणे
  19. जिवाजीराव पवार - देवास (मध्यप्रदेश)
  20. जोत्याजी केसरकर - पुनाळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
  21. तानाजी मालुसरे - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
  22. महाराणी ताराबाई भोसले - संगम माहुली जि. सातारा
  23. तुकोजीराव पवार - देवास (मध्यप्रदेश)
  24. त्र्यंबकराव दाभाडे - डभोई जि. बडोदा (गुजरात)
  25. दमाजी गायकवाड - सावली जि. बडोदा (गुजरात)
  26. दिपाऊराजे बांदल - पिसावरे ता. भोर जि. पुणे
  27. धनाजी जाधव - वडगाव ता. हातकणंगले जि. कोल्हापूर
  28. नाना फडणवीस - नानावाडा, पुणे
  29. नारायणराव पेशवे - ओंकारेश्वर, पुणे
  30. नारोजी मुदगल देशपांडे - वडगाव मावळ जि. पुणे
  31. नारोशंकर राजेबहादूर - मालेगाव जि. नाशिक
  32. परशुराम त्र्यंबक प्रतिनिधी - संगम माहुली जि. सातारा
  33. पिलाजी गायकवाड - सावली जि. बडोदा (गुजरात)
  34. प्रतापराव गुजर - नेसरी ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर
  35. फत्तेसिंह भोसले - अक्कलकोट जि. सोलापूर
  36. बजाजी निंबाळकर - फलटण जि. सातारा. बजाजी निंबाळकर यांचा मुलगा महादजी व सून सखुबाई यांची समाधी माळशिरस गावी आहे. सखुबाई ही शिवाजीची मुलगी.
  37. बहिर्जी घोरपडे - गजेंद्रगड जि. गदग (कर्नाटक)
  38. बहिर्जी नाईक - बाणूरगड ता. खानापूर जि.सांगली
  39. बाजी पासलकर - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
  40. पिलाजी गोळे - पिरंगुट ता.मुळशी जि. पुणे
  41. पेशवे पहिले बाजीराव - रावेरखेडी जि. खरगोण (मध्यप्रदेश)
  42. बाजीप्रभू देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
  43. बाळाजी आवजी चिटणीस - ओंढा ता. पाली जि. रायगड
  44. पेशवे बाळाजी बाजीराव - शनिवारवाडा जि. पुणे
  45. पेशवे बाळाजी विश्वनाथ - सासवड ता. पुरंदर जि. पुणे
  46. फुलाजी देशपांडे - विशाळगड जि. कोल्हापूर
  47. भवानीबाई (महाराणी येसूबाई भोसले कन्या) - पाटण जि. सातारा
  48. मदारी मेहतर - किल्ले रायगड जि. रायगड
  49. मल्हारराव होळकर - आलमपूर जि. भिंड (मध्यप्रदेश)
  50. महादजी शिंदे - वानवडी पुणे जि. पुणे
  51. पेशवे थोरले माधवराव - थेऊर ता. दौंड जि. पुणे
  52. मायनाक भंडारी - भाटे जि. रत्‍नागिरी
  53. मालोजीराजे भोसले - इंदापूर जि. पुणे (की घृष्णेश्वर मंदिरासमोर?)
  54. मुरारबाजी देशपांडे - किल्ले पुरंदर जि. पुणे
  55. म्हालोजी घोरपडे - संगमेश्वर जि. रत्‍नागिरी
  56. यशवंतराव पवार - धार (मध्यप्रदेश)
  57. महाराणी येसूबाईसाहेब भोसले - संगम माहुली जि. सातारा
  58. रघुजी भोसले - नागपूर
  59. रघुनाथराव पेशवे - कोपरगाव जि. अहमदनगर
  60. राजसबाई भोसले - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  61. छत्रपती राजाराम महाराज - किल्ले सिंहगड जि. पुणे
  62. राणोजी घोरपडे - नागपूर
  63. राणोजी शिंदे - उज्जैन (मध्यप्रदेश)
  64. रामचंद्रपंत अमात्य - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  65. रामशास्त्री प्रभुणे - माहुली संगम जि. सातारा
  66. रायबा मालुसरे - किल्ले पारगड ता. चंदगड जि. कोल्हापूर
  67. रायाजी जाधव - भुईंज जि. सातारा
  68. लखम सावंत - सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग
  69. लखुजीराजे जाधवराव - सिंदखेडराजा जि. बुलढाणा
  70. शंकराजी नारायण सचिव - आंबवडे ता. भोर जि. पुणे
  71. शहाजीराजे भोसले - होदेगिरी जि. दावणगिरी (कर्नाटक)
  72. शंभुसिंग जाधव - माळेगाव ता. बारामती जि. पुणे
  73. छत्रपती शाहू महाराज - संगम माहुली जि. सातारा
  74. सरदार खंडोजी दादजी मानकर - (छत्रपती शाहू पर्व)- मौजे खरवली,ता.माणगांव,जि.रायगड (महाराष्ट्र)
  75. शिवा काशीद - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  76. छत्रपती शिवाजी महाराज - किल्ले रायगड जि. रायगड
  77. शेलार मामा - उमरठ ता. पोलादपूर जि. रायगड
  78. सईबाई भोसले - किल्ले राजगड ता. राजगड जि. पुणे
  79. संताजी घोरपडे - कारखेल ता. माण जि. सातारा
  80. संताजीराव शिळीमकर(देशमुख) - किल्ले राजगड जि. पुणे
  81. संभाजी आंग्रे - गिर्ये ता. विजयदुर्ग जि. सिंधुदुर्ग
  82. शिवाजीचा मोठा भाऊ संभाजी भोसले - कणकगिरी जि. कोप्पल (कर्नाटक)
  83. छत्रपती संभाजी भोसले - तुळापूर जि. पुणे
  84. छत्रपती संभाजी राजे दुसरे - पन्हाळगड जि. कोल्हापूर
  85. सवाई माधवराव पेशवे - शनिवारवाडा, पुणे
  86. सिधोजी निंबाळकर - पट्टा किल्ला ता. अकोले जि. अहमदनगर
  87. सूर्याजीराव काकडे(देशमुख) - किल्ले साल्हेर जि. नाशिक
  88. सूर्याजी मालुसरे - साखर ता. पोलादपूर जि.रायगड
  89. हंबिराव मोहिते - औंध ता.फलटण जिल्हा.सातारा
  90. हिरोजी फर्जंद - ओंढा ता. पाली जि. रायगड
  91. बाबाजी ढमढेरे सरकार . तळेगाव ढमढेरे ता शिरूर जिल्हा पुणे
  92. विठ्ठल सुंदर राक्षसभुवन
  93. हारजीराजे बर्गे कोरेगांव सातारा
                                     महाराजा यशवंतराव होळकर भानपुरा

महाराणी तुळसाबाई होळकर महिदपूर युवराज खंडेराव होळकर गांगरसोली