मराठवाडी बोली
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मराठवाडी बोली: महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर,जालना,बीड,परभणी,लातूर, हिंगोली, धाराशिव,नांदेड हे सर्व जिल्हे येथें जी बोली बोलली जाते त्या बोलीस मराठ्वाडी बोली असे म्हणले जाते .महाराष्ट्र कर्नाटक सिमावार्तीभाग यात धाराशिव व लातूर जिल्ह्यात या बोलीचे एक वेगळेपण दिसून येते"[१].या भागातील संस्कृतीचा खास टच या भाषेला आहे" त्यात एक वेगळीच नजाकत आहे .बोलताना कानडीचा हेल व क्रियापदावर परिणाम जाणवतो .मात्र कानडी भाषेचा प्रभाव या भाषेवर नाही. महाराष्ट्र व तेलंगाना या सीमावर्ती भागातही मराठवाडी बोली बोलली जाते .या ठिकाणी सुद्धा तेलुगू भाषेचा मोठा परिणाम जाणवतो जसे उदा :काय करता ? या ऐवजी काय करताव ?.वगैरे . या बोलीवर उर्दू भाषेचाही प्रभाव आहे ".मराठवाडी बोलीचे तिचे असे एक वळण आहे खास खुमारी आणि या बोलीतील अगणित शब्दांचा लक्षणीय असा ठसा आहे" .मराठवाडी बोलीतील नादानुकारी शब्द वापरामुळे ही भाषा अधिकच नादमधूर होत जाते .उदा:टुकूटुकू ,धडाधडा,फिदीफिदी ,फराफरा ,इ .
- ^ 'मराठवाडी बोली' लोकसत्ता ,लोकरंग 'मायबोली 'मुखपृष्ट ,'सीमावर्ती मराठवाडी बोली '-बालाजी मदन इंगळे ,जानेवारी ,६ ,२०१३