मध्यावधी निवडणुका
Appearance
विशिष्ट परिस्थितीत निश्चित कालावधीच्या ( पाच वर्षे ) आधीच लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या निवडणुका घ्याव्या लागतात. अशा निवडणुकांना " मध्यावधी निवडणुका " असे म्हणतात.
बहुमताने अधिकारावर आलेले सरकार मुदतीआधीच पक्षफुटीमुळे अल्पमतात येऊ शकते. काही वेळा एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्यास दोन किंवा अनेक पक्षांची आघाडी करून सरकार स्थापन केले जाते.परंतु मुदती आधीच आघाडीत फूट पडून अल्पमतात येते.अल्पमतात आलेल्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो. अशा वेळी पर्यायी सरकार सरकार स्थापन करण्याची शक्यता नसल्यास लोकसभा किंवा विधानसभा मुदतपूर्व बरखास्त करावी लागते.अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतात.