भोवरा (खेळ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोवरा किंवा भवरा हा एक खेळाचे साधन आहे. हे शंक्वाकाराचे असते. त्यास सहसा लोखंडाचे एक निमुळते टोक असते.त्यास आरु असे म्हणतात. दोरी किंवा जाळी गुंडाळण्यासाठी सोयीचे व्हावे म्हणुन त्यास विशेष प्रकारची सोय केलेली असते. दोरी त्याच्या सभोवती गुंडाळून, त्याचे गाठ मारलेले एक टोक हातात धरून तो जमिनीवर झटक्याने फेकला जातो व फिरवला जातो. पूर्वी हा लाकडाचा असायचा. सध्या प्लास्टीकमध्ये हे उपलब्ध आहेत.तसेच ते 'फायबर'चे देखील असतात.

भोवरा हा खेळ मुळतः भारतीय आहे. हा खेळ भारत तसेच चीनजपानमध्येही खेळला जातो.विशेषतः पावसाळयात हा खेळ रंगतो. चिंधकाने बोटे बांधू्न गरागरा भोवरे फिरवता येतात. ज्याच्यावर डाव येईल त्याचा भोवरा रिंगणात मांडतात. बाकीचे खेळाडू पोरे त्या भोवऱ्याला गुच्चे मारतात.

या खेळात काही वेळा भोवरे फुटतात. काही विद्रुपदेखील होतात.भोवरा झेलणारया पोरांना जखमाही होतात.काही तिडतिडे भोवरे जाळी खातात.असा भोवरा ताड्कन उडू्न डोळ्यांवर लागतो.

हा खेळ प्रामुख्याने ग्रामीण भागात खेळला जातो.हा खेळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.