भैरी भवानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Wikitext.svg
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.
उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


भैरी भवानी हे संपुर्ण कोकण वासियांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी हा शंकराचा अवतार असुन त्याच्या भैरव किंवा भैरवनाथ या नावाचा भैरी, बहीरीनाथ हा अपभ्रंश आहे. शंकराच्या मार्तंडभैरव अवतारातील मल्हारी, खंडोबा आणि भैरी हे एकच रूप आहे. तरी कुलदेव्हार्‍यात भैरी व खंडोबाच्या वेगवेगळ्या मुर्ती पुजल्या जातात. भवानी देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव कुलस्वामी आहे. कोळी, आगरी, गवळी, कुणबी, भंडारी, खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजात भैरी देवाला विषेश स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहीरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकविरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर कारल्याच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कारल्याच्या डोंगरावरील एकविरेचा मंदिरात एकविरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणार्ता म्हणून ओळखला जातो. कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव, भैरवनाथ, भैरोबा, भैरी, बहीरी, खंडोबा या नावांची स्थाने आहेत.