भारतीय वाघ
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
बेंगाल टायगर अथवा भारतीय वाघ-(Panthera tigris tigris)
ब्रिटीश सर्वात प्रथम भारतात बंगालमध्येच स्थायिक झाल्याने त्यांनी भारतीय वाघाचे बंगाली वाघ असेच नामकरण केले. भारतीय उपजात ही भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व ब्रम्हदेशात आढळते. भारतातील विविध प्रकारच्या जंगलात त्याचे अस्तित्व आहे. हा आकाराने मध्यम वाघ असून त्याचे २०५ ते २२७ किलो पर्यंत वजन भरते. मादीचे साधारणपणे १४० किलोपर्यंत वजन असते. उत्तर भारतातील वाघांचे वजन दक्षिणेतील वाघांच्या तुलनेत जास्त असते. सध्यस्थितीत भारतात २००० पे़क्षाही कमी वाघ आहेत.सध्याच्या गणनेनुसार भारतात १,४११ वाघ आहेत जे २००२ मधील गणनेपेक्षा ७० टक्यांपेक्षाही कमी आहेत. २००२ मध्ये भारतात ३,६४२ वाघ होते [१]व ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. १९७२ मध्ये वाघांना कायद्यानुसार सरक्षंण मिळाले व अनेक व्याघ्रप्रकल्पांची स्थापना करण्यात आली. त्यानुसार साधारणपणे १९९० पर्यंत चांगले यश मिळाले ४५०० पर्यंत वाघांची संख्या पोहोचण्यास मदत झाली.[२] परंतु आंतराष्ट्रीय माफ़ियांनी भारतीय वाघांना लक्ष्य केले व चोरट्या शिकारीत वाढ ज़ाली. चोरट्या शिकारीमुळे सरिस्का सारख्या एकेकाळी बरेच वाघ असणाऱ्य व्याघ्रप्रकल्पातून आज वाघ नाहिसे झाले आहेत.[३]