भारतीय नागरिकत्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नागरिक म्हणजे राज्याचा सभासद असणारी व्यक्ती होय. व्यक्तीचे राज्याशी संबंधित असणारे हे सभासदत्व म्हणजे नागरिकत्व होय . राज्याचे सभासद असल्याने नागरिकांना काही नागरी व राजकीय हक्क प्राप्त होतात. देशाच्या राज्यकारभारात सहभागी होण्याचा त्यांना अधिकार असतो. नागरिकांना त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनात बदल घडवून आणण्याचा अधिकार असतो. नागरिकांना काही कर्तव्ये व जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात . राज्यसंस्था नागरिकांच्या हितासाठी अनेक कायदे करते , धोरणे आखते व नागरिकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असते . नागरिकांनी राज्याच्या या प्रयत्नांना उचित प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणजेच त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखून त्या पार पाडाण्याबाबत दक्ष असले पाहिजे.

भारतीय नागरिकत्व : नागरिकत्वाच्या प्राप्तीसंबधी प्रत्येक देशाने काही कायदे केलेले असतात .