भारतीय औषधशास्त्रज्ञ संघटना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय औषधशास्त्रज्ञ संघटना ही भारतातील औषधशात्रज्ञांची व्यावसायिक संघटना आहे. सदस्यांमध्ये रुग्णालयातील औषधशास्त्रज्ञ, मॅन्युफॅक्चरिंग औषधशास्त्रज्ञ, शिक्षक आणि चिकित्सालयीन औषधशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे . २०११ मध्ये स्थापित केलेली ही संघटना ग्लोबल हेल्थ वर्कफोर्स अलायन्स (डब्ल्यूएचओ)ची सदस्य आहे. ही संघटना ही भारतातील औषधशात्रज्ञांची सर्वात मोठी संस्था म्हणून उदयास येत आहे. भारतातील आरोग्य सेवा क्षेत्रात फार्मसिस्टची भूमिका निभावण्यासाठी आयपीएचे मुख्य उद्दीष्ट आहे.

भारतीय औषधशास्त्रज्ञ संघटनेने नुकतीच दिल्लीतील मौलाना आझाद दंत विज्ञान संस्था येथे भारतीय औषधशात्रज्ञांची एक राष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. या परिषदेचा विषय होता 'आव्हाने आज आणि उद्या.' परिषदेमध्ये विविध राज्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या विविध संघटना सहभागी झाल्या. [१]

संदर्भ[संपादन]

 

  1. ^ "IPA Organises National Seminar entry". Financial Express. 16 March 2014 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]