भारतातील सामाजिक चळवळ व राज्यशास्त्र
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
भारतामधील सामाजिक चळवळीमध्ये सहभागी झालेले नेतृत्व राजकारणात कृतीशील होते. यांची ठळक उदाहरणे म्हणजे महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही दोन दिसून येतात या दोन उदाहरणांच्या आधारे असेही म्हणता येते कि सामाजिक चळवळी हे विध्याक्षेत्र राजकारणचा कणा आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि दलित चळवळ यामधून उदारमतवाद, लोकशाही, सामाजिक न्याय, घटनावाद अशा आधुनिक विचारप्रणालीचे स्वतंत्र्य असे भारतीय अर्थ देखील अभिव्यक्त झाले आहेत. तर हिंदुत्व चळवळीमध्ये राजकारण या क्षेत्राबद्दल आरंभी मतभिन्नता होती. हिंदू परिवारातील संघ हा राजकारणापासून अलिप्त राहण्याची भूमिका घेत होता. दुसरीकडे सावकरनिष्ठ हिंदू परिवार राजकारणाशी जुळवून घेत होता. स्वतात्रोत्तर काळात मात्र सर्वच हिंदुत्व परिवाराने राजकारणाशी संबंध प्रस्थापित केले. यासाठी बाळासाहेब देवरसांनी भूमिका घेतल्याचे दिसते. कारण हिंदुत्व चळवळ आणि राजकारण यांचे संबंध कसे असावेत हा मुख्य कळीचा प्रश्न होता. देवारासनी हिंदुत्व चळवळ आणि राजकारण यांचे हिंदुत्व परिवारात ऐक्य घडवून आणले. तसेच त्यांनी हिंदुराजकारणाचा आधार हिंदुत्व चळवळ म्हणून विकसीत केली. अशा चळवळीमध्ये घडणाऱ्या घडामोडींचा अन्वयार्थ कसा लावावा हा राज्याशास्त्राज्ञांच्या पुढील मध्यवर्ती प्रश्न होता. कारण राशालो विरोध असे चळवळीचे स्वरूप आहे, अशी मुख्य धारणा होती. रा म्हणजे राजकारण, शां म्हणजे शांतता आणि लो म्हणजे लोकशाही होय. या तीन प्रमुख घटकांच्या विरोधातील स्वरूप आणि संकल्पना अशी धारणा अभ्यासकांमध्ये मध्यवर्ती होती.