भारतातील रस्ते चिन्हे
Jump to navigation
Jump to search
भारतीय प्रजासत्ताकामधील रस्त्यांची चिन्हे युनायटेड किंगडमच्या काही भागात वापरल्या गेलेल्या चिन्हांशी तत्सम आहेत.
बहुतेक शहरी रस्ते आणि राज्य महामार्गांवर राज्य भाषा आणि इंग्रजीमध्ये चिन्हे आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर राज्य भाषा, हिंदी आणि इंग्रजी भाषेत चिन्हे आहेत.
चिन्हांचे विविध प्रकार[संपादन]
भारतात रस्ते चिन्हांच्या तीन प्रमुख श्रेणी आहेत, त्या आहेत (१) नियामक चिन्हे- वर्तुळामध्ये दर्शविलेले ही चिन्हे नियम व कायदे दर्शवितात.(२) द्वितीय श्रेणी म्हणजे चेतावणी-चिन्हे जी त्रिकोणात दर्शविली जातात. (३) तिसरे म्हणजे आयतामध्ये दर्शिवलेली माहिती-चिन्हे. या तिघांव्यतिरिक्त आपल्याकडे आणखी दोन प्रकारची चिन्हफलक आढळतात ती म्हणजे मार्ग द्या (उलट त्रिकोणी आकारामध्ये दर्शिवतात ) आणि थांबा (अष्टकोनी आकार ) .