भागेय गोवर्धन
Appearance
भागेय गोवर्धन (ऑक्टोबर ३१, १९३४- जुलै ३१, १९९३) हे भारतीय राजकारणी होते. ते १९८९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये जनता दलाचे उमेदवार म्हणून तर १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून ओरिसा राज्यातील मयुरभंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते चंद्रशेखर यांच्या सरकारमध्ये मनुष्यबळ विकास राज्यमंत्री होते.