भांडवल बाजार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भांडवल बाजार म्हणजे संस्थांनी भांडवल उभारणीसाठी तसेच भांडवलांच्या समभाग देवाण घेवाण करण्यासाठी आणि कर्जाच्या देवाण-घेवाणीचे व्यवहार चालवण्यासाठी निर्माण केलेली व्यवस्था होय. या बाजारात उद्योजक आणि व्यावसायिक संस्था आपले समभाग बॉडस् इ. विकून दीर्घकालीन भांडवलाची उभारणी करतात. हे मिळालेले भांडवल उत्पादक भांडवलात गुंतविले जाते. येथे सरकारही पिअसे उभे करण्यासाठी आपले दीर्घकालीन कर्जरोखे भांडवल बाजारात विकण्यास आणते.

गुंतवणूक करताना घ्यावयाची काळजी[संपादन]

1. गुंतवणूक करताना कोणत्या कंपनी निवड कराव्यात.

2. गुंतवणूक करताना मार्केट ची परिस्थिती कशी आहे ते पहावे.

3. गुंतवणूक करताना दीर्घ काळासाठी करणार आहे का? आणि अल्प काळासाठी हे ठरविणे आवश्यक आहे.

शेअर मार्केट चे नियम=[संपादन]

1. सगळे नियम पाळून आणि पूर्णपणे अभ्यास करून, दरवेळेस ट्रेड केल्यानंतर जर तुम्हाला लॉस होत असेल तर असे समजावे की शेअर मार्केट हे तुमच्यासाठी नाही. तुमच्या साठी लकी नाहीये असे समजून सोडून द्या. नाहीतर एक दोन वर्ष थांबा आणि परत प्रयत्न करा.

2. कोणत्याही स्ट्रॅटेजी नुसार किंवा ऍडव्हायझरी वाल्या नुसार ट्रेड करायचा असेल तर पहिले 20 ट्रेडिंग दिवस पेपर ट्रेड करा. 20 पैकी कमीत कमी 17 दिवस नेट प्रॉफिट असले पाहिजे. जर नसेल तर त्या नुसार ट्रेड करू नका.

3. स्ट्रॅटेजि योग्य वाटली की सुरवातीला खूप कमी शेअर्स घेऊन सुरवात करा. पूर्ण आठवडा प्रॉफिट मध्ये असेल तर दर सोमवारी 25% शेअर्स वाढवा.

4. परफेक्ट चान्स असेल तरच ट्रेड करा. एका दिवसात जास्तीत जास्त दोन ते तीन ट्रेड करा. ओव्हर ट्रेडिंग करू नये.

5. टारगेट किंवा स्टॉप लॉस हिट झाला की लगेच बाहेर पडा. स्टॉप लॉस उडाल्या नंतर एव्हरेज किंवा हेजिंग वैगरे असल्या गोष्टी करू नये. भावनिक होऊन ट्रेड करू नका. कारण ट्रेडिंग हे गणिता वरती चालते तुमच्या मनावर किंवा भावनेवर चालत नाही.

6. मागील लॉस कव्हर करण्यासाठी ट्रेड करू नका. असं केल्यावर अजून लॉस होईल. खूप कॉन्फिडन्स मध्ये किंवा खूप टेन्शनमध्ये ट्रेडिंग करू नका. याच्यामुळे चुकीच्या ठिकाणी ट्रेड पडतो आणि लॉस होतो.

7. शेअर मार्केट ट्रेडिंग फुल टाइम करू नका. कितीही प्रॉफिट मिळू द्या फुल टाइम अजिबात करू नका. जगा मधील कोणताच यशस्वी ट्रेडर किंवा इन्वस्टर फुल टाईम शेअर मार्केट करत नाही, त्यांचे अन्य अजून काहीतरी इन्कम सोर्स असतात. उदाहरणार्थ ब्रोकिंग फर्म, ऍडव्हायझरी फर्म, कन्सल्टन्सी फर्म.

8. शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म असले काहीही नसते. ह्या सगळ्या व्याख्या आपल्या मनाची समजूत घालण्यासाठी असतात. योग्य वेळी स्टॉक खरेदी करा आणि योग्य वेळी स्टॉक विक्री करा, कोणत्याही व्याख्या लावून उगाच स्टॉक होल्ड करू नका.

9. फक्त इन्ट्राडे करणारा आणि फक्त इन्वेस्टमेंट करणारा व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही. जो योग्य वेळी दोन्ही ट्रेडिंग करतो तोच व्यक्ती यशस्वी होतो.

10. नवीन लोकांनी कमीत कमी 3,4 वर्ष ऑपशन किंवा फियूचर ट्रेडिंग करू नये.

11. ज्या व्यक्तीला पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ पाहून स्टॉक खरेदी विक्री करता येत नसेल तर त्या व्यक्तीने शेअर मार्केट करू नये. कारण तुम्हाला जर खरेदी-विक्री जमत नसेल तर तुम्ही टेक्निकल अनालिसिस आणि फंडामेंटल अनालिसिस कितपत शिकणार आणि कसे शिकणार.

12. कोणत्याही स्थितीमध्ये संधी शोधण्याची आणि फास्ट निर्णय घेण्याची क्षमता असणारच व्यक्ती यशस्वी होतो.

13. जो व्यक्ती शेअर मार्केटला लकी ड्रॉ किंवा जुगार समजतो तो कधीच यशस्वी होणार नाही. शेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे. जसे कोणत्याही व्यवसायाला स्टेबल व्हायला तीन ते चार वर्षे लागतात, तसेच तीन-चार वर्ष कष्ट, प्रयत्न ठेवले तर शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट चालू होतो.

14. तीन वर्षानंतर, 80-20 च्या नियमानुसार, 20% कष्ट केले की, 80% प्रॉफिट झाले पाहिजे. तरच शेअर मार्केट मध्ये पैसे मिळतील. नाहीतर 80% कष्ट करून, 20% प्रॉफिट होत असेल तर, शेअर मार्केट कडे जास्त लक्ष देऊ नका.

हेही पाहा[संपादन]