Jump to content

फ्लाइट डेटा रेकॉर्डर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्लॅक बॉक्स या पानावरून पुनर्निर्देशित)

फ्लाइट डेटा रेकॉर्डर किंवा हे विमानांत बसविण्यात येणारे उपकरण आहे. फ्लाइट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाच्या यांत्रिक कार्याची नोंद ठेवली जाते. त्यात इंजिनचे तापमान, जमिनीपासून उंची, वेग या सगळ्या बाबींचा समावेश असतो. वैमानिकांनी केलेल्या विमान चालन सूचना यात मुद्रित होतात. यामुळे विमान चालवताना वैमानिकांनी कोणते निर्णय कधी घेतले याची माहिती मिळते. तसेच उपकरणांनी त्या सूचनांना कसा प्रतिसाद दिला हे सुद्धा यात नोंदवले जाते. काही वेळा याला ॲक्सिडेंट डेटा रेकॉर्डर असेही म्हणतात. फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डर या दोन्हीचा मिळून ब्लॅक बॉक्स बनतो. ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक डेव्हिड वॉरेन यांनी कॉमेट या विमानाला झालेल्या अपघातानंतर ब्लॅक बॉक्स या उपकरणाची रचना केली. या द्वारे विमानांमध्ये दोष असतील किंवा वैमानिकांच्या चालनात चुका होत असतील तरी त्या फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहितीचा अभ्यास केल्यानंतर समजतात. हवामान कसे होते, विमानाचा वेग किती होता, किती उंचीवरून विमान चालले होते इत्यादी सर्व माहिती यात भरली जात असते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत