Jump to content

डॅरेन सॅमी क्रिकेट मैदान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोसेजू मैदान, सेंट लुशिया या पानावरून पुनर्निर्देशित)
बोसेजू स्टेडियममधीले क्रिकेट सामना

बोसेजू स्टेडियम (इंग्लिश: Beausejour stadium) (सध्या:डरेन सॅमी क्रिकेट मैदान) हे कॅरिबियनमधील सेंट लुसिया देशामधील एक क्रिकेट स्टेडियम आहे. २००२ साली बांधले गेलेल्या ह्या स्टेडियमची आसनक्षमता २०,००० असून हे स्टेडियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते. येथील पहिला एकदिवसीय सामना ८ जून २००२ रोजी वेस्ट इंडीजन्यू झीलंड दरम्यान तर पहिला कसोटी सामना २०-२४ जून २००३ रोजी वेस्ट इंडीज व श्रीलंका दरम्यान खेळवला गेला.

बोसेजू स्टेडियममध्ये २००७ क्रिकेट विश्वचषकामधील सहा साखळी फेरीच्या व एक उपांत्य फेरीच्या सामन्याचे तसेच २०१० २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या ८ साखळी व दोन्ही उपांत्य सामन्यांचे आयोजन केले गेले होते.