बॉम्बे हाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बॉम्बे हाय तथा मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून १६० कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. ओ.एन.जी.सी. मुंबई हायचे परिचालन करते.

मुंबई हाय तैलक्षेत्राचा शोध १९६४-६७ च्या दरम्यान भारत आणि रशियाच्या संयुक्त तेल संशोधन संघाला भूगर्भ संशोधन जहाजातून खंभातच्या अखातात केलेल्या मोहीमेत लागला. ३ फेब्रुवारी, इ.स. १९७४ रोजी बॉम्बे हाय येथे सागरसम्राट ही पहिली खनिज तेलविहीर खणली गेली. इ.स. २००४ पर्यंत मुंबई हाय भारताच्या एकूण नैसर्गिक तेल मागणीच्या १४% मागणीची पूर्तता करत होती.

या क्षेत्रातून पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायू उरण येथे आणून साठवला जातो.