Jump to content

बेलवडे बुद्रुक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बेलवडे बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील एक गाव आहे. सातारा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक शेवटचे गाव आहे. या गावाचा समावेश सातारा लोकसभा मतदारसंघात आणि कराड-दक्षिण विधानसभा मतदारसंघात होतो.

बेलवडे गावात कसे जाल?

[संपादन]
  • पुणे-बेंगळुरू हायवे - आशियाई महामार्ग 47 (AH47) (पुर्वीचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 (NH4)) वरून कराड शहरापासून दक्षिणेस १६ किलोमीटर व मालखेड फाट्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. गावात येण्यासाठी एसटी महामंडळाची (कराड आगार) कराड - कासारशिरंबे ही बस व खासगी रिक्षांची प्रवाशी वाहतूकीची सोय आहे. कराड (ओगलेवाडी) रेल्वे स्टेशनपासून दक्षिणेकडे २२ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.
  • बेलवडे बुद्रुक गावाच्या पुर्वेस मालखेड, पश्चिमेस कासारशिरंबे, दक्षिणेस कासेगाव (जिल्हा- सांगली), उत्तरेस कालवडे ही गावे आहेत.

बेलवडे गावाची वैशिष्टये

[संपादन]
  • या गावात पुर्वी खुप मोठा जनावरांचा व तरकारी बाजार भरायचा त्‍यामुळे बाजार बेलवडे म्‍हणून पंचक्रोशित परिचित आहे. सध्या दर शुक्रवारी आठवडी तरकारी बाजार भरतो.
  • गावात पहिली ते चौथी पर्यंत जिल्‍हा परिषद शाळा आहे. व पाचवी ते दहावी पर्यंतचे ब्रह्मदास विद्यालय आहे.
  • हे गाव शेती प्रदान आहे.
  • गावातील प्रमुख पिक हे #ऊस आहे. त्याबरोबर सोयाबीन, हळद, गहू, भुईमूग इ. हंगामी पिकेही मोठ्या प्रमाणात केली जातात.
  1. गावातील मोठ्या प्रमाणात पिकणारा ऊस प्रामुख्याने कृष्णा सहकारी साखर कारखाना, रयत सहकारी साखर कारखाना, राजारामबापू सहकारी साखर कारखाना (जि. सांगली), जयवंत शुगर इ. कारखान्यांना पुरवठा केला जातो.
  2. हळद ही सांगली मार्केटला विक्रीसाठी पाठविली जाते.
  3. सोयाबीन हे गावातील व्यापाऱ्यांकडे विक्री केली जाते. तर काही वेळा वाठार, कासेगाव येथील व्यापाऱ्यांकडे सोयाबीनची विक्री केली जाते.
  4. तरकारी भाजीपाला हा गावातील आठवडी बाजारात, कासेगाव किंवा कराड येथील मार्केटमध्ये विक्री केला जातो.
  • गावातील काही शेतकऱ्यांना शासकीय व सहकारी संस्थांकडून #पुरस्कारही मिळाला आहे. काही शेतकऱ्यांचा सन्मानही झाला आहे.
  • या गावामधून आषाढी पायी दिंडी सोहळा, संत बाळूमामा पायी दिंडी सोहळा, गगनगिरी महाराज पायी दिंडी सोहळा, गोरक्षनाथ महाराज पायी दिंडी सोहळा अशा चार दिंडी सोहळे भक्ती भावाने साजरे केले जातात. गावची हनुमान जयंती व दत्त जयंतीला यात्रा भरते.
  • गावामध्ये सर्व जातीधर्माचे लोक तसेच बारा बलुतेदार समाज आहे.
  • #क्रिडा क्षेत्रातही या गावाचा नावलौकिक आहे. खो-खो, कुस्‍ती, कबड्डी, ॲथलेटिक्स इ. प्रकारात प्राविण्य मिळविले आहे.
  • गावात सर्वच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते-पदाधिकारी, वेगवेगळ्या गटाचे कार्यकर्ते, वेगवेगळ्या संघटनांचे कार्यकर्ते आहेत.
  • गावामध्ये विविध गणेश व दुर्गादेवी मंडळांच्या पुजेचा महाप्रसाद, हरिनाम सप्ताह, दत्त मंदिरात प्रत्‍येक पौर्णिमेला महाप्रसाद, बाळूमामा मंदिरात प्रत्‍येक आमवस्याला महाप्रसाद असे विविध सार्वजनिक कार्यक्रमातून #अन्नदान केले जाते.
  • गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तसेच खासगी दवाखाने आहेत.
  • पशुवैद्यकीय दवाखाना आहे., जिल्हा सहकारी बँकेची शाखा, खासगी पतसंस्था आहेत.
  • शासकीय व खासगी वाचनालये आहेत.
  • गावच्या पुर्वेस २.५ किलोमीटर अंतरावर कृष्णा नदी आहे.

गावातील प्रार्थना स्थळे

[संपादन]

श्री हनुमान मंदिर, राम मंदिर, लक्ष्मी मंदिर, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, बिरोबा मंदिर, गणेश मंदिर, दत्त मंदिर, ब्रह्मदास महाराज मठ, राधा-क्रष्ण मंदिर, बाळुमामा मंदिर, जनार्दन महाराज मंदिर, नारायण महाराज मंदिर, नागोबा मंदिर, महाकुबाई मंदिर, सटवाई मंदिर, मशिद.

श्री हनुमान हे गावचे ग्रामदैवत आहे व श्री लक्ष्मीमाता ही गावची ग्रामदेवता आहे. या गावात श्री ब्रह्मदास महाराजांनी समाधी घेतली आहे. हा परिसर निसर्गरम्य असा पाहण्यासारखा आहे. नारायण महाराज यांचीही समाधी आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये अगदी ठराविकच जनार्दन महाराज यांची मंदिरे आहेत त्यापैकी एक मंदीर बेलवडे बुद्रुक गावामध्ये आहे.

  • गावची लोक संख्या - 4097 (2020 पर्यंत) - पुरुषांची संख्या - 2063 - महिलांची संख्या - 2034
  • #पिनकोड नंबर - 415539
  • गावचे एकूण क्षेत्रफळ - 465 हेक्टर, बागायती क्षेत्रफळ -432 हेक्टर, गावठाण क्षेत्रफळ -32 .88 हेक्टर
  • गावात चार वॉर्ड रचना आहे.
  1. नारायण वॉर्ड
  2. हनुमान वॉर्ड
  3. लक्ष्मी वॉर्ड
  4. राम वॉर्ड
  • ग्रापंचायतीची स्‍थापना सन 1953 साली झाली आहे.
  • आतापर्यंत 17 सरपंचांनी पदभार संभाळला आहे.

गावातील काही क्षणचित्रे

[संपादन]
हनुमान मंदिर
हनुमान मंदिर
हनुमान जयंती यात्रेतील एक क्षण
हनुमान जयंती यात्रेतील एक क्षण
जि.प.शाळा
जि.प.शाळा
जनार्दन महाराज मंदिर
जनार्दन महाराज मंदिर
जाोतिबाची सासन काठी
जाोतिबाची सासन काठी
दत्त मंदिर व ब्रह्मदास महाराज समाधी
दत्त मंदिर व ब्रह्मदास महाराज समाधी
गणेशपुराण ग्रंथ पारायण साोहळा
गणेशपुराण ग्रंथ पारायण साोहळा
ब्रहम्दास विद्यालयाचा परिसर
ब्रहम्दास विद्यालयाचा परिसर
ग्रामपंचायत नवीन इमारत. (2024)