बेअर ग्रिल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बेअर ग्रिल्स
Coventry Scouts groups have a visit from Bear Grylls.jpg
जन्म एडवर्ड मायकल ग्रिल्स
७ जून, १९७४ (1974-06-07) (वय: ४८)
डोनाघडी, उत्तर आयर्लंड
निवासस्थान
प्रशिक्षणसंस्था
पेशा
धर्म ख्रिश्चन
जोडीदार शारा कॅनिंग्ज नाईट[३]
अपत्ये जेस्सी, मर्माड्यूक[४] आणि हकलबेरी[५]
वडील मायकल ग्रिल्स
आई लेडी सारा ग्रिल्स
संकेतस्थळ
beargrylls.com


एडवर्ड मायकल "बेअर" ग्रिल्स (जन्म ७ जून १९७४) एक ब्रिटिश साहसवीर, लेखक आणि दूरचित्रवाणी प्रस्तुतकर्ता आहे. ते त्यांच्या मॅन व्हर्सस वाइल्ड (२००६-२०११) या दूरदर्शन मालिकेसाठी जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी निर्मनुष्य ठिकाणी जगण्याच्या (विल्डरनेस सर्व्हायव्हल) अनेक दूरदर्शन मालिका युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेत केल्या आहेत. २००९ मध्ये ते वयाच्या ३५व्या वर्षी ब्रिटनमधील सर्वात कमी वयाचे मुख्य स्काऊट झाले. त्यांनी वयाच्या २३व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट शिखर सर केले. सर्वात कमी वयात माउंट एव्हरेस्ट सर करणारे ते ब्रिटनचे पहिले नागरिक झाले. बेअर ग्रिल्सचा जगभरात लोकप्रिय टीव्ही शो आहे. डिस्कवरी चॅनेलवर दिसणारा MAN VS WILD हा त्याचा शो आहे. [६]

वैयक्तिक जीवन[संपादन]

ग्रिल्स यांचा जन्म उत्तर आयर्लंड मधल्या डोनाघडी इथे झाला.[७][८] वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत ते तिथेच वाढले त्यानंतर त्यांचे कुटुंब आईल ऑफ व्हाइट वरील बेंम्ब्रिज येथे स्थानांतरित झाले.[९][१०] ते कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे राजकीय नेते सर मायकल ग्रिल्स आणि लेडी ग्रिल्स (उर्फ सारा फोर्ड) यांचे सुपुत्र आहेत. लेडी ग्रिल्स यांचे वडील नेव्हिल फोर्ड क्रिकेट खेळाडू आणि उद्योगपती होते तर त्यांची आई पॅट्रिशिया फोर्ड काही काळ अल्स्टर संघवादी दलाच्या सांसद होत्या.[११] ग्रिल्स यांना लारा फॉसेट ही मोठी बहीण आहे जी कार्डिओ-टेनिसची प्रशिक्षक आहे. त्यांच्या या बहिणीने ते एका आठवड्याचे असताना त्यांना बेअर हे टोपणनाव दिले होते.[१२]

ग्रिल्स यांचे शिक्षण लुडग्रोव स्कूल, एटन कॉलेज, जिथे त्यांनी तिथला पहिला पर्वतारोहण क्लब सुरू करण्यात मदत केली[१३] आणि बर्कबेक, लंडन विद्यापीठात झाले जिथे त्यांनी २००२ साली हिस्पॅनिक अभ्यासात अंशकालिक पदवी मिळवली.[१४]

अतिशय कमी वयात ते त्यांच्या वडिलांकडून उंचावर चढणे आणि जहाज चालवायला शिकले. लहान वयातच ते स्कायडाइव्ह करायला शिकले आणि त्यांनी शोटोकान कराटेमध्ये दुसऱ्या डॅनचा ब्लॅक बेल्ट मिळवला. त्यांना इंग्रजी, स्पॅनिश आणि फ्रेंच या भाषा येतात.[१५] ग्रिल्स ख्रिश्चन आहेत आणि धर्म हा जीवनाचा कणा आहे असे ते त्याचे वर्णन करतात.

ग्रिल्स यांनी २००० साली शारा कॅनिंग्स नाईट यांच्याशी लग्न केले.[३][११] त्यांना तीन मुले आहेत - जेस्सी, मर्माड्यूक आणि हकलबेरी.

सैन्यातील सेवा[संपादन]

अन्य मोहिमा[संपादन]

मीडिया[संपादन]

मुख्य स्काऊट[संपादन]

इतर[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "व्हू डेअर्स विन्स". The Echo (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 2. ^ हॅस्टी, जेनी. "धिस इज व्हेअर वी हाईड फ्रॉम द वर्ल्ड" (इंग्रजी भाषेत).
 3. ^ a b "आऊट ऑफ द वाइल्ड: बेअर ग्रिल्स सर्व्हाइव्स द अर्बन जंगल" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 16 March 2008. 14 July 2008 रोजी पाहिले.
 4. ^ "बेअर ग्रिल्स: मॅन व्हर्सस वाइल्ड" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 14 July 2008. १२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
 5. ^ "बेअर ग्रिल्स वेलकम्स सन हकलबेरी" (इंग्रजी भाषेत).
 6. ^ "Biography in Marathi : प्रेरणादायी जीवनचरित्र". biographymarathi.com. 2021-03-18 रोजी पाहिले.
 7. ^ "फेथ कीप्स मी स्ट्रॉंग, सेयस् बेअर ग्रिल्स" (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 8. ^ "बेअर ग्रिल्स" (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 9. ^ "संडे लाईफ रिक्लेम्स द सेलेब्स विथ उल्स्टर टाएज" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 17 July 2010. १२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
 10. ^ "माय लाईफ इन ट्रॅव्हेल: बेअर ग्रिल्स" (इंग्रजी भाषेत).
 11. ^ a b "Person Page 24749" (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 25 July 2008. 14 July 2008 रोजी पाहिले. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
 12. ^ डडमॅन, जेन. "लीडिंग क्वेश्चन्स: बेअर ग्रिल्स, चीफ स्काऊट". London, UK.
 13. ^ केट मिखाईल. "लाईफ सपोर्ट" (इंग्रजी भाषेत). London. १२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 14. ^ "नोटेबल ॲल्युमनाय" (इंग्रजी भाषेत). १२ एप्रिल २०१६ रोजी पाहिले.
 15. ^ "Ask Bear Your Questions", BearGrylls.com; accessed 3 August 2015.