बॅफिन बेट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बॅफिन बेट
कॅनडाच्या नकाशावर बॅफिन बेटाचे स्थान
स्थान उत्तर अमेरिका
क्षेत्रफळ ५,०७,४५१ चौ. किमी
लोकसंख्या १०,७४५
देश कॅनडा ध्वज कॅनडा
लोकसंख्या घनता ०.०२ प्रति चौ. किमी

बॅफिन (इनुक्टिटुट: ᕿᑭᖅᑖᓗᒃ, फ्रेंच: Île de Baffin or Terre de Baffin) हे कॅनडा देशातील आकाराने सर्वात मोठे तर जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे बेट आहे. बॅफिन बेटाच्या दक्षिणेस हडसन सामुद्रधुनीच्या पलीकडे कॅनडाचा क्वेबेक हा प्रांत तर पूर्वेस बॅफिनचा उपसागर व त्याच्या पलीकडे ग्रीनलॅंड हे बेट आहेत. इंग्लिश शोधक विल्यम बॅफिन ह्याचे नाव ह्या बेटाला दिले गेले आहे.

राजकीय दृष्ट्या बॅफिन बेट कॅनडाच्या नुनाव्हुत ह्या प्रदेशाचा भाग आहे. नुनाव्हुतची राजधानी इक्वाल्युईत ह्याच बेटावर स्थित असून येथील बव्हंशी लोकवस्ती इक्वाल्युईत परिसरारामध्येच आहे.

बाहय दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत