बिब्बा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बिब्बा वृक्ष
बिब्ब्याची पाने व फळे यांचे चितारलेले चित्र

बिब्बा (शास्त्रीय नाव: Semecarpus anacardium) बिब्बा किंवा भिलावा (संस्कृत शब्द भल्लातक आणि अग्निमुखी) इंग्रजीमध्ये मार्किंग नट ट्री इत्यादी नावाने ओळखला जाणारा व ॲनाकार्डिएसी या कुळातला हा पानझडी प्रकारचा हा वृक्ष आहे. भारतीय प्राचीन ग्रंथांमध्ये आलेल्या उल्लेखावरून हा भारतीय मुळाचा असावा असे वाटते. भारतासहित ऑस्ट्रेलिया व ईस्ट इंडीज येथे हा वृक्ष आढळतो .

रचना[संपादन]

बिब्बा हा मध्यम उंचीचा वृक्ष असून याची उंची ५ ते ८ मीटरपर्यंत असू शकते. पाने गुळगुळीत व पाठीमागून खरबरीत असतात. पानांचा आकार मोठा असून टोकाकडे गोलाकार असतो. फुले लहान हिरवट पांढरी व पिवळसर असतात. काजुप्रमाणे याला बोंड फळे येतात. ती पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत