Jump to content

बाळंभट देवधर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मल्लखांब या खेळाचे संशोधक व आद्यगुरू म्हणून बाळंभट देवधर (इ.स. १७८०-१८५२) ओळखले जातात. बाळंभट देवधर हे जाणकार कुस्तीगीर आणि कसरतपटू होते. ते बाजीराव पेशवे यांच्या दरबारात होते. मल्लविद्येत अधिक प्रभुत्व मिळावे म्हणून मल्लखांब हा वेगळा कसरतप्रकार या बाळंभटांनी शोधून काढला. [१]एकाग्रता, चपळता, तोल सांभाळण्याचे कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणाऱ्या या मल्लखांब विद्येचे युद्धशास्त्रात खूप महत्त्व आहे. राणी लक्ष्मीबाई यांनीही या विद्येत प्रावीण्य मिळविले होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अस्सल मराठमोळा व्यायामप्रकार 'मल्लखांब!'". दैनिक तरुण भारत. ४ जून, इ.स. २०१३. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]