बालकविता
Appearance
बालकविता या लहान मुलांसाठी लिहिलेल्या कविता होत. अशा कविता परंपरागत चालत आलेल्या असतात किंवा एखाद्या आधुनिक कवीने लिहिलेल्या असतात.
उदाहरण,
मुंगी उडाली आकाशीं।
तिणें गिळीलें सूर्याशीं ॥१॥
थोर नवलाव जांला।
वांझे पुत्र प्रसवला ॥२॥
विंचु पाताळाशी जाय।
शेष माथां वंदी पाय ॥३॥
माशी व्याली घार झाली।
देखोनी मुक्ताई हांसली ॥४॥
बालकविता लिहिणारे आधुनिक कवी
[संपादन]- रेव्हरंड टिळक
- लक्ष्मीबाई टिळक
- वि. म. कुलकर्णी
पुस्तक
[संपादन]जुन्या बालकवितांपासून नव्या बालकवितांपर्यंतच्या समग्र कवितांचा आढावा डॉ. शोभा इंगवले यांनी ’आधुनिक मराठी बालकविता’ या दोन खंडी पुस्तकातून घेतला आहे. या पुस्तकात बालकवितांची वैशिष्ट्ये, प्रयोजन, कल्पनारम्यता अशा गोष्टींवर लेखिकेने भाष्य केले आहे. पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरील कवितांचे वर्गीकरणही केले आहे.[ संदर्भ हवा ]