Jump to content

बारक्या मांगात

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील आमगाव या गावी बारक्या मांगात ह्यांचा १ जून १९५३ रोजी जन्म झाला.अखिल भारतीय किसान सभेचे केंद्रीय समिती सदस्य, ठाणे जिल्हा सचिव मंडळ सदस्य, आदिवासी राष्ट्रीय मंच महाराष्ट्र राज्य निमंत्रक, ठाणे जिल्हा परिषद सदस्य, तलासरी पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी आदिवासी समाजाच्या विकासासाठी भरपूर कार्य केले. सन १९८५ मध्ये त्यांनी अच्छाड, सावरोली, डोंगरी, धिमानिया, वडवली, उंबरगाव, सारीगाव येथील औद्योगिक वसाहतीत आदिवासी युवक-युवतींना काम मिळवून दिले.३१ मार्च २०२२ रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.[१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, शनिवार दिनांक ९ सप्टेंबर २०२३