Jump to content

बनवडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कोरेगांव तालुका, सातारा जिल्हा. महाराष्ट्र *येथे पिनकोड लिहा*

सातारा-वाठार रस्त्यावर अंबवडे (सकुंडे) या गावापासून सुमारे सात किमीवर आहे.या गावाला चंदन-वंदन या किल्ल्याची पार्श्वभूमी आहे. चंदन-वंदन या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतिक आहे. दरवर्षी येणारा ऊरूस हिंदु-मुस्लिम एकत्र साजरा करतातच पण गावातील मंदिर आणि मस्जीद अगदी शेजारी खेटुन आहेत,दोन्ही धर्मिय सर्व सण मिळून मिसळून साजरे करतात. येथील वाडसिद्धनाथाची यात्रा बगाडासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील बावऱ्या हा बैल शर्यतीसाठी प्रसिद्ध होता. बावऱ्या हा बैल ज्या शर्यतीत सहभागी झाला त्या शर्यतीचं पहिलं बक्षिस बावऱ्यानंच मारलं आहे. बावऱ्याच्या निधनानंतर बावऱ्याचे मालक श्री. जगन्नाथ जाधव यांनी बावऱ्याची समाधी बांधून नवा आदर्श घालून दिला आहे. तसेच श्री. जगन्नाथ जाधव आजपर्यंत बावऱ्याचं वर्षश्राद्ध खालून त्यानिमित्ताने अख्ख्या गावाला अन्नदान करतात. बनवडी हे गाव काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दत्तक घेऊन घावात अनेक लोकोपयोगी योजना राबवल्या.