बटुभाई उमरवाडिया
बटुभाई उमरवाडिया हे गुजराती साहित्यातील नवीन इंग्रजी पद्धतीच्या एकांकिकांचे जनक. मत्स्यगंधा अने बीजा नाटको (१८२५) व मालादेवी अने बीजा नाटको (१९२७) हे त्यांचे दोन प्रसिद्ध एकांकिकासंग्रह होत. त्यांच्या एकांकिकांमध्ये विषयाचे वैविध्य असून कथाविकास नाट्यात्मक पद्धतीने केलेला आढळतो. त्यांतील व्यक्तीरेखा जिवंत असून संवाद प्रभावी आहेत. एकंदरीत त्यांच्या एकांकीकारचनेवर इब्सेनच्या नाट्यतंत्राचा प्रभाव दिसतो. कलादृष्ट्या कथानकाचा अतिविस्तार व घटनांची मंदगती हे दोन दोष त्यांच्या नाट्यरचनेत प्रामुख्याने आढळतात.
बटुभाईंनी एकांकिकांव्यतिरिक्त काव्य (रसगीतो – १९२०), लघुकथा (वातोनुंवन – १९२४), व्यक्तिचित्रे (गुजरातना महाजनो), टीका (कीर्तिदाने कमळनापत्रो – १९३८) असे अन्य वाङ्मयप्रकारही हाताळले आहेत.
त्यांचा जन्म १३ जुलै १८९९ आणि मृत्यू १८ जानेवरी १९५० रोजी झाला.