बकीबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बकीबॉल C60 ची रचना

बकीबॉल हा कार्बनचा एक प्रकार आहे. कार्बनचे ६० अणू परस्परांशी बद्ध होऊन बकीबॉलचा रेणू तयार होतो. बकीबॉलच्या रचनेत कार्बनचे ६० रेणू, १२ पंचकोन व २० षटकोन अशा आकारात परस्परांशी जोडलेले असतात. हा आकार फूटबॉलसारखा असतो. या आकाराला 'ट्रन्केटेड आयकोसाहेड्रॉन' असे म्हणतात. बकीबॉल मध्यभागी पोकळ असून तो सहजतेने इतर अणू किंवा रेणूंबरोबर संबद्ध होत नाही.

शोध[संपादन]

हेरॉल्ड क्रोटो
रिचर्ड स्मॅले

बकीबॉलचा रेणू सर्वप्रथम इ.स. १९८५ साली हेरॉल्ड क्रोटो, जेम्स हिथ, सीन ओब्रायन, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॅले यांनी राइस विद्यापीठात तयार केला.[१] या शोधासाठी क्रोटो, कर्ल आणि स्मॅले यांना इ.स. १९९६च्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ क्रोटे, एच. डब्लू.; हिथ, जे. आर.; ओब्रायन, एस. सी.; कर्ल, आर. एफ.; स्मॅले, आर. ई. (इ.स. १९८५). "C60: Buckminsterfullerene" [C60: बकमिन्स्टरफुलेरिन]. नेचर ३१८ (६०४२): १६२–१६३. डी.ओ.आय.:10.1038/318162a0. बिबकोड:1985Natur.318..162K.