Jump to content

बकीबॉल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बकमिन्स्टरफुलेरिन या पानावरून पुनर्निर्देशित)
बकीबॉल C60ची रचना

बकीबॉल हा कार्बनचा एक प्रकार आहे. कार्बनचे ६० अणू परस्परांशी बद्ध होऊन बकीबॉलचा रेणू तयार होतो. बकीबॉलच्या रचनेत कार्बनचे ६० रेणू, १२ पंचकोन व २० षटकोन अशा आकारात परस्परांशी जोडलेले असतात. हा आकार फूटबॉलसारखा असतो. या आकाराला 'ट्रन्केटेड आयकोसाहेड्रॉन' असे म्हणतात. बकीबॉल मध्यभागी पोकळ असून तो सहजतेने इतर अणू किंवा रेणूंबरोबर संबद्ध होत नाही.

चित्र:Richard Smalley.jpg
हेरॉल्ड क्रोटो
रिचर्ड स्मॅले

बकीबॉलचा रेणू सर्वप्रथम इ.स. १९८५ साली हेरॉल्ड क्रोटो, जेम्स हिथ, सीन ओब्रायन, रॉबर्ट कर्ल आणि रिचर्ड स्मॅले यांनी राइस विद्यापीठात तयार केला.[] या शोधासाठी क्रोटो, कर्ल आणि स्मॅले यांना इ.स. १९९६ च्या रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ क्रोटे, एच. डब्लू.; हिथ, जे. आर.; ओब्रायन, एस. सी.; कर्ल, आर. एफ.; स्मॅले, आर. ई. C60: Buckminsterfullerene. नेचर. pp. १६२–१६३. Unknown parameter |अनुवादीत title= ignored (सहाय्य)