Jump to content

राष्ट्रीय स्टेडियम, ढाका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बंगबंधू राष्ट्रीय स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
नॅशनल स्टेडियम, ढाका बांगलादेश

राष्ट्रीय स्टेडियम, ढाका हे १९५४ साली बांधले गेलेले बांगलादेशचे राष्ट्रीय आणि प्रमुख स्टेडियम आहे, जे ढाक्यात स्थित आहे. हे ढाक्याच्या मध्यवर्ती भागात, मोटिजील भागात स्थित आहे. हे स्टेडियम पूर्वी आणि अद्यापही १ नंबर राष्ट्रीय स्टेडियम म्हणून ओळखले जाते. पूर्वी या स्टेडियममध्ये सर्व प्रकारचे खेळ आयोजित केले जात. परंतु सध्या हे स्टेडियम फक्त फुटबॉल मैदान म्हणून वापरले जात आहे. याची आसनक्षमता सुमारे ३६,००० आहे.