Jump to content

बँकेत खाते उघडण्यासाठी आवश्यक गोष्टी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फायदे

आपली कमाई सुरक्षित ठेवणे,

बचत केलेल्या रकमेवर व्याज प्राप्त करण्यासाठी,

तिस-या  पक्षाकडून पैसा जमा करून घेण्यासाठी (चेक, बँक ड्राफ्ट, रोख किंवा ऑनलाईन)

यूटिलिटी बिलाचा भरणा करण्यासाठी (उदा. एलआयसी प्रीमियम, ट्रेनचे तिकीट बुकींग)

बँकेत खाते उघडण्यासाठी काय गरजेचे आहे

भरलेला अर्ज (हा संबंधित बँकेच्या शाखेतून घेता येतो)

दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.

ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी

राहत्या पत्त्याची झेरॉक्स कॉपी

रोख रु. १००० (ही रक्कम प्रत्येक बँकेनुसार बदलते)

एक गॅरंटर (ज्याचे त्या आगोदर बँकेत खाते आहे) जो आपल्या अर्जावर सही करेल

सूचना: ओळकखपत्र आणि राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी दोन वेगवेगळे कागद प्रस्तूत केले जावेत.

ओळखपत्र म्हणून दिल्या जाणा-या प्रमाणासाठी खालीलपैकी कोणतीही वस्तू वापरता येते :

पासपोर्ट (पत्ता वेगळा असतो अशा वेळी),

मतदान ओळखपत्र,

पॅनकार्ड,

सरकारी/ सैनिक ओळखपत्र,

एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र,

वाहन परवाना

पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो आयडी कार्ड

राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी खालील पैकी कोणताही कागद लावता येतो :

क्रेडिट कार्ड स्टेटमेंट

पगार-पावती (पत्त्यासकट)

आयकर/ संपत्ति कर निर्धारण आदेश

वीज बिल

दूरध्वनी बिल

बँक खाते स्टेटमेंट

एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र

कोणत्याही मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाकडून पत्र

रेशन कार्ड

एलपी गॅस बिल

एकदा खाते उघडल्यावर, आपल्याला खालील कागदपत्र मिळतील :

आपल्या नावाचे फोटो असलेले पासबुक

एटीएम आणि डेबिट कार्ड (ह्यासाठी कमीतकमी दोन आठवडे लागतात)

चेक बुक (ह्यासाठीदेखील दोन आठवडे कमीतकमी लागतात)