फ्लाईंग टायगर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फ्लाईंग टायगर्स तथा फर्स्ट अमेरिकन व्हॉलन्टीयर ग्रुप ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान चीनच्या प्रजासत्ताकाच्या वायुसेनेचा एक भाग होता. यातील सर्व वैमानिक युनायटेड स्टेट्स आर्मी एर कोर (अमेरिकेची वायुसेना), अमेरिकेचे आरमार आणि युनायटेड स्टेट्स मरीन कोरमधील लढाऊ वैमानिक होते.

क्लेर ली शेनॉच्या नेतृत्त्वाखाली कर्टिस पी४०-बी वॉरहॉक विमाने असलेली ही सेना चीनी ध्वजाखाली लढत असली तरीही त्याची सूत्रे अमेरिकेच्या सेनापतींच्या हातात होती. फ्लाईंग टायगर्सची मुख्य भूमिका जपानी सैन्यापासून चीनचा बचाव करणे ही होती. यांत प्रत्येकी सुमारे ३० विमाने असलेल्या तीन स्क्वॉड्रन होत्या.