Jump to content

फ्रेंच फ्राईज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेंच फ्राईज
Fries 2
पर्यायी नावे चिप्स, फिंगर चिप्स, फ्राईज, फ्रायट्स, गरम चिप्स, स्टेक फ्राय, बटाटा वेज, वेजेस
जेवणातील कोर्स साइड डिश किंवा स्नॅक, क्वचितच मुख्य डिश म्हणून
उगम बेल्जियम किंवा फ्रान्स (विवादित)
अन्न वाढण्याचे तापमान गरम
मुख्य घटक
  • बटाटे
  • खाण्याचे तेल
भिन्नता कुरळे फ्राई, शूस्ट्रिंग फ्राईज, स्टेक फ्राई, गोड बटाटा फ्राई, मिरची चीज फ्राय, पोटीन
इतर माहिती बऱ्याचदा मीठ आणि केचप, मेयोनिज, व्हिनेगर, बार्बेक्यू सॉस किंवा इतर सॉससह सर्व्ह केले जाते.

फ्रेंच फ्राईज हे तेलात तळलेले बटाटे असतात. हे बटाटे चौकोनी आकारात कापून तुरटीच्या पाण्यात भिजवून मग तळतात. या पदार्थाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखतात. उदा. फिंगर चीप (भारतीय इंग्रजी) [], फ्राईज (नॉर्थ अमेरिकन इंग्लिश), चिप्स (ब्रिटिश आणि कॉमनवेल्थ इंग्लिश) [].

फ्रेंच फ्राईज एकतर मऊ किंवा कुरकुरीत गरमागरम खायला दिले जातात. ते जेवणाचा एक भाग म्हणून किंवा जेवण म्हणून खाल्ले जातात. ते सामान्यतः हॉटेलच्या, फास्ट फूड रेस्टॉरंट्सच्या, पबच्या आणि बारच्या मेनूवर दिसतात. ते सहसा मीठ आणि काळीमिरी घातलून खातात. देशानुसार केचप, व्हिनेगर, मेयोनिज, टोमॅटो सॉस किंवा इतर स्थानिक वैशिष्ट्यांसह खाल्ले जाऊ शकतात. पोटीन किंवा मिरची चीज फ्राइझच्या डिशेसप्रमाणेच, फ्राईज कमी - अधिक प्रमाणात ताटात दिल्या जातात. बटाट्याऐवजी कुमारा किंवा रताळ्यांपासून चिप्स बनवता येतात. याचाच एक भाजलेला प्रकार म्हणजे ओव्हन चीप, हा कमी तेलात किंवा तेल न लावताच बनवला जातो.[] फ्रेंच फ्राईजचा युरोपमध्ये सापडणारा अतिशय आवडता पदार्थ म्हणजे फिश अँड चिप्स आहे.

बनवायची पद्धत

[संपादन]
मेयोनिजच्या पॅकेटसह पोम्म्स फ्राइट्स

फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी प्रथम बटाटे (सोललेले किंवा न सोललेले) एकसारख्या चौकोनी लांबट आकारात कापून घेतात. नंतर पृष्ठभागातील स्टार्च काढून टाकण्यासाठी ते बटाट्याचे तुकडे पुसून घ्यावेत किंवा थंड पाण्यात भिजवावे आणि नंतर पूर्णपणे वाळूवून घ्यावेत.[][] त्यानंतर ते एक किंवा दोन टप्प्यात तळले जातात. शेफ्स मानतात की दोन टप्प्यात तळले तर फ्रेंच फ्राईज चांगले लागतात.[][][] जमिनीतून बाहेर काढलेल्या ताज्या बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त असते परिणामी त्यापासून बनवलेले फ्रेंच फ्राईज मउ बनतात, असे फ्रेंच फ्राईज खायला छान लागत नाहीत. म्हणून थोडे जून झालेले, काही काळासाठी साठवलेले बटाटे वापरण्यास प्राधान्य दिले जाते.[]

फ्रेंच फ्राईज बनवण्याच्या दोन-टप्प्याच्या पद्धतीत, प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या प्रकारे कामे केली जातात. पहिल्या टप्प्याला ब्लॅंचिंग म्हणतात, यात गरम तेलात (सुमारे १६० डिग्री सेल्सियस) ते छान तळून घेतात, यामुळे ते छान शिजतात. हा टप्पा आधी करून ठेवता येतो.[] दुसऱ्या टप्प्यात, बाहेरील आवरण कुरकुरीत करण्यासाठी ते अधिक गरम तेलात (१९० अंश सेल्सियस) मध्ये परत तळतात. त्यानंतर तेल निथळण्यासाठी थोड्यावेळासाठी चाळणीत किंवा कपड्यावर ठेवतात. आणि मग मीठ टाकून खायला देतात. दोन्ही टप्प्यांमध्ये तळण्यासाठीचा वेळ हा बटाट्यांच्या आकारावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ, २-३ मि.मी.च्या पट्ट्यांकरिता, पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे ३ मिनिटे तळावे लागते आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये फक्त काही सेकंद लागतात.[] अनेक विविध तंत्र वापरून फ्रेंच फ्राईज बनवू शकतात. डिप फ्राईंग पद्धतीत बटाट्याचे काप तेलात पुर्णपणे बुडवले जातात. व्हॅक्यूम फ्रायर्स ही पद्धत कमी दर्जाच्या बटाट्यांवर प्रक्रिया करण्यासाठी योग्य आहे. ह्या बटाट्यांमध्ये साखरेचे प्रमाण साध्या बटाट्यांपेक्षा जास्त असते कारण नवीन कापणीतील बटाटे उपलब्ध होण्यापूर्वी वसंत ऋतु आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस प्रक्रिया करून हे बटाटे बनवले जातात.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Indian English,"finger chip". Cambridge Dictionary Online.
  2. ^ "chip: definition of chip in Oxford dictionary (British English)". Oxforddictionaries.com. 12 September 2013. 2016-03-08 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 16 September 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Chunky oven chips". BBC Good Food. BBC. 7 March 2016 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d Saint-Ange, Evelyn and Aratow, Paul (translator) (2005) [1927]. La Bonne Cuisine de Madame E. Saint-Ange: The Essential Companion for Authentic French Cooking. Larousse, translation Ten Speed Press. p. 553. ISBN 978-1-58008-605-9.CS1 maint: multiple names: authors list (link)
  5. ^ Fannie Farmer, The Boston Cooking-School Cook Book, 1896, s.v.
  6. ^ Blumenthal, Heston (17 April 2012). "How to cook perfect spuds". the age. 12 October 2012 रोजी पाहिले.
  7. ^ Bocuse, Paul (10 December 1998). La Cuisine du marché (French भाषेत). Paris: Flammarion. ISBN 978-2-08-202518-8.CS1 maint: unrecognized language (link)
  8. ^ "Russet Burbank". idahopotato.com. 9 January 2018 रोजी पाहिले.