फोर्ट्रान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

फोर्ट्रान सर्वात जुनी म्हणजे 1957 पासून वापरली जाणारी पहिली संगणकीय भाषा आहे. आय बी एम या कंपनीने सर्वप्रथम या भाषेचा विकास केला. ही भाषा मुख्यत्वे करून वैज्ञानिक व इंजिनियरिंगच्या कामासाठी वापरली जाते. मूलतः गणितातील आकडेमोड सूत्रे संगणकाच्या भाषेत रूपांतरित करण्यासाठी ही भाषा वापरली जाते. पण ह्या भाषेतील प्रोग्राम फार हळू चालतात. यातील सूचना मुख्यतः आउटपुट, इनपुट, आकडेमोड इ. प्रकारच्या असतात. या सूचनांमध्ये बदल करणे सोपे असते.

संगणकाकडून कोणतेही काम करून घेण्यासाठी , प्रथम सूचनांची एक यादी प्रोग्रॅमिङ् लॅंग्वेजचा उपयोग करून तयार केली जाते. ह्या यादीला 'प्रोग्रॅम' म्हटले जाते. संगणक ह्या यादीनुसार ठरावीक क्रमाने, ठरावीक क्रिया करून इच्छित काम पार पाडतो.

प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजेसचे अनेक वेगवेगळ्या दृष्टीने वर्गीकरण केले जाते .

कार्यनिष्ठ भाषा (Procedural languages) उदा. सी (C), कोबॉल (COBOL), फोर्ट्रान, बेसिक, एपीएल