फेमिनिझम इन इंडिया
फेमिनीजम इन इंडिया' हे पुस्तक २००४ मध्ये, kali for women and women unlimited ने प्रकाशित केलेले व मैत्रेयी चौधरी यांनी संपादित केलेले आहे.
प्रस्तावना
[संपादन]वेगवेगळ्या दशकांत विविध मासिके,पुस्तके,भाषणे,पत्रके व सरकारी दस्तऐवज यांत प्रकाशित झालेल्या स्त्रीवादी लेखांचे संकलन या पुस्तकात पहावयास मिळते. संशोधक, स्त्री- अभ्यासाचे अध्यापक आणि कार्यकर्ते या सर्वांकरिता गरजेचे ठरावे या उद्देशातून साकारलेले दिसते.पुस्तकाचे विभाजन ६ भागांत करण्यात आलेले आहे.
ठळक मुद्दे
[संपादन]या पहिल्या भागामध्ये कमला भसीन,सुमा चिटणीस,मधु किश्वर,मेरी जॉन व रुथ वनिता या स्त्रीवादी अभ्यासकांच्या शोधनिबंधांचा समावेश करण्यात आलेला आहे. भारतामध्ये 'स्त्रीवाद' या संकल्पनेभोवती अनेक वादविवाद व अभ्यासकांची भिन्न मतमतांतरे आहेत. स्त्रीवाद म्हणजे पाश्चात्य,भरकटलेला मार्ग होय आणि स्त्रीवादी असणे म्हणजे पुरुषांचा तिरस्कार करणाऱ्या, घर उध्वस्त करणाऱ्या वा bra burning सारख्या कृती करणाऱ्या स्त्रिया यांसारख्या कल्पना घेऊन स्त्रीवादाबाबत भारतात सुरुवातीपासूनच अनेक गैरसमज उभे राहिलेले व स्वतःला स्त्रीवादी म्हणवून घेण्याबाबतची भीती निर्माण झालेली दिसते. स्त्रीवादाभोवती असणाऱ्या या गैरसमजांना ,प्रश्नांना भिडत याबाबतचे गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न भसीन व खान यांच्या some questions on feminism and its relevance in south Asia या प्रकरणात करतात. भारतातील स्त्रियांचे प्रश्न हे पाश्चात्य जगातील स्त्रियांपेक्षा वेगळे आहेत. भारतातील स्त्रियांचा सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश हा मुळातच राष्ट्रवादी चळवळीच्या माध्यमातून होतो. Feminism: Indian ethos and indian Convictions या प्रकरणामध्ये सुमा चिटणीस भारतीय भूमीत स्त्रीवाद नावाची गोष्ट पचवणे का कठीण गेले याची मांडणी करतात. कुठलाही ' वाद' हा विशिष्ट सामाजिक संस्कृतीच्या व विशिष्ट काळाच्या टप्प्यावर उदयाला येत असतो व याचा संबंध सत्तासंबंधांशी असतो, अशी मांडणी करत मधु किश्वर या प्रकरणात स्वतःवर स्त्रीवादी असण्याचा शिक्का मारण्याची कशी आवश्यकता नाही हे सांगतात. पुस्तकाच्या some early feminist visions या दुसऱ्या भागात ताराबाई शिंदे यांचा स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातील लेख, कोर्नीला सोराबजी यांचे strey thoughts of an Indian girl by cornelia sorabji व रोकेय्या हुसेन यांचे sultana's dream या तीन शोधनिबंधांचा समावेश आहे. या तिन्ही स्त्री लेखिका १९ व्या शतकातील आहेत. १९ व्या शतकाच्या टप्प्यावर पितृसत्तेवर जहाल टीका करणारे आवाज भारतात होते हे या शोधनिबंधांतून पुढे येताना दिसते.या शोधनिबंधांतून स्त्रियांचे अनुभव व स्वदृष्टीकोन यावर प्रकाश पडलेला दिसतो तसेच या लेखांच्या माध्यमातून त्या आपल्या सामाजिक पार्श्वभूमीकडे लक्ष्य वेधतात.
प्रतिसाद
[संपादन]ख्रिस्टीन यांच्या मते, वसाहतोत्तर काळाच्या चर्चाविश्वात या पुस्तकाचे महत्त्वपूर्ण योगदान ठरलेले आहे.[१]