फेदेरिको गार्सिया लोर्का

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फेथेरीको गार्सीआ लोर्का
Federico García Lorca. Huerta de San Vicente, Granada.jpg
लोर्का, सन १९१४
जन्म नाव फेदेरिको देल साग्रादो कोराझो दि हेसुस गार्सिया लोर्का
जन्म जून ५, इ.स. १८९८
फ्वेंते व्हाकेरोस, ग्रानादा, आंदालुसिया, स्पेन
मृत्यू ऑगस्ट १९, इ.स. १९३६
ग्रानादा, स्पेन
राष्ट्रीयत्व स्पॅनिश
कार्यक्षेत्र साहित्य
साहित्य प्रकार काव्य, नाट्यलेखन, नाट्यदिग्दर्शन
चळवळ जनरेशन ऑफ २७
वडील फेथेरीको गार्सीआ रॉड्रिग्ज
आई व्हिसेंटा लोर्का रोमरो
स्वाक्षरी फेदेरिको गार्सिया लोर्का ह्यांची स्वाक्षरी

हे नाव स्पेनमधील रिवाजाप्रमाणे आहे; पहिले किंवा पितृकुलनाम गार्सिया असून दुसरे किंवा मातृकुलनाम लोर्का आहे.

फेदेरिको देल साग्रादो कोराझो दि हेसुस गार्सिया लोर्का (स्पॅनिश उच्चार : feðeˈɾiko ɣarˈθi.a ˈlorka (फेथेरीको गार्सीआ लोर्का); जून , इ.स. १८९८ - ऑगस्ट १९, इ.स. १९३६) हा स्पॅनिश कवी, नाटककार आणि रंगमंचीय दिग्दर्शक होता. जनरेशन ऑफ २७चा प्रतीकात्मक प्रतिनिधी म्हणून गार्सिया लोर्काला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली. स्पॅनिश गृहयुद्धात फॅसिस्ट गटाच्या लोकांनी लोर्काचा खून केला. सन २००८ मध्ये एका स्पॅनिश न्यायाधीशाने लोर्काच्या मृत्यूची चौकशी सुरू केली. अल्फकरजवळच्या संभाव्य दफनस्थळाचे उत्खनन करण्यास गार्सिया लोर्का कुटुंबाने अखेर परवानगी दिली पण त्या जागी मानवी अवशेष मिळाले नाहीत.