Jump to content

फॅबियानो कारुआना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फॅबियानो कारुआना
पूर्ण नाव फॅबियानो लुईजी कारुआना
देश अमेरिका युनायटेड स्टेट्स (२००५ पूर्वी; २०१५ पासून)
इटली इटली (२००५-२०१५)
जन्म ३० जुलै, १९९२ (1992-07-30) (वय: ३३)
पद ग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन २७८९ (क्र. ३) (ऑक्टोबर २०२५)
सर्वोच्च गुणांकन २८४४ (ऑक्टोबर २०१४)

फॅबियानो कारुआना (जन्म जुलै ३०, १९९२) हा एक इटालियन आणि अमेरिकन बुद्धिबळ ग्रॅंडमास्टर आहे जो चार वेळा युनायटेड स्टेट्स बुद्धिबळ चॅम्पियन झाला आहे. २८४४ च्या सर्वोच्च गुणांकनासह, कारुआना इतिहासातील तिसरा सर्वोच्च गुणांकना असलेला खेळाडू आहे. जुलै १५, २००७ रोजी कारुआना १४ वर्षे, ११ महिने, २० दिवस इतक्या वयाचा असताना ग्रॅंडमास्टर झाला.

२०१४-१५ मध्ये फिडे ग्रँड प्रिक्स जिंकून, कारुआना २०१६ च्या कॅंडिडेटस् टूर्नामेंटसाठी पात्र ठरला, जिथे तो सर्गेई कर्जाकिन नंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने पुढील कॅंडिडेटस् टूर्नामेंट २०१८ जिंकले, १९७२ मध्ये बॉबी फिशर नंतर निर्विवाद जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेसाठी तो पहिला अमेरिकन चॅलेंजर बनला. चॅम्पियनशिप सामन्यापूर्वी, त्याने ग्रेंके चेस क्लासिक, नॉर्वे चेस जिंकला आणि सिंकफिल्ड कपमध्ये प्रथम स्थान मिळवले. सर्व बारा क्लासिकल सामने बरोबरीत सोडल्यानंतर कॅरुआना मॅग्नस कार्लसनकडून रॅपिड टायब्रेकमध्ये जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद गमावले. तो पात्र ठरला आणि पुढील सर्व कॅंडिडेटस् टूर्नामेंटमध्ये सहभागी झाला : २०२०, २०२२ आणि २०२४. सध्या तो २०२६ कॅंडिडेटस् टूर्नामेंटसाठी देखील पात्र ठरला आहे. २०२५ मध्ये, त्याने ईस्पोर्ट्स संघटना टीम लिक्विडशी करार केला.