फिंच
Appearance
फिंच पक्षी हे मध्ये मध्यम आकाराचे काहीसे पारदर्शक पिसे असणारे असतात आणि फ्रिंजिलिडी कुलात मोडतात. या पक्षांची चोच छोटी, मजबूत व शंकूसारखी टोकदार असते. ही चोच वेगवेगळ्या फळांच्या बिया खाण्यासाठी उपयोगी ठरते. ते विविध अधिवासांचे क्षेत्र व्यापतात आणि स्थलांतर करीत नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि ध्रुवीय प्रदेश वगळता त्यांचे जगभरात अस्तित्त्व आहे. या फ्रिंजिलिडी कुलात सिपिन्स, कॅनेरीज, रेडपॉल्स, सेरीन्स, ग्रीन्सीक आणि युफोनिअस जाती मोडतात.