फलाफल
Appearance
फलाफल (मराठी लेखनभेद: फेलाफिल, फेलॅफिल ; अरबी: فلافل ; रोमन लिपी: Falafel ;) हा मध्यपूर्वेत प्रचलित असलेला, भरड वाटलेल्या छोल्यांचे गोळे किंवा थाप्या तळून बनवला जाणारा खाद्यपदार्थ आहे. काही वेळा छोल्यांऐवजी यासाठी फावा शेंगांच्या दाण्यांचे पीठ वापरले जाते. फलाफल सहसा पिट्यामधोमध किंवा लाफा रोट्यांमधोमध दाबून किंवा गुंडाळून खाल्ले जातात. फलाफलांवर मुरवलेल्या भाज्या किंवा भाज्यांचे सलाड व ताहीनीपासून बनवलेले सॉसदेखील खाल्ले जातात.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- ब्लॉग 'वदनी कवळ घेता' - फलाफलाची पाककृती (मराठी मजकूर)