प्रियदर्शिनी कुलकर्णी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रियदर्शिनी कुलकर्णी या जयपूर-अत्रौली घराण्याच्या एक प्रसिद्ध गायिका आहेत. त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून विशेष प्रावीण्यासह मायक्रो-बायाॅलॉजी विषयात एम.एस्‌सी व पुण्याच्या एसएनडीटी विद्यापीठातून कॉलेजमधून संगीत विषय घेऊन एमए केले.

प्रियदर्शिनी कुलकर्णी यांचा जन्म सामाजिक विचारवंत, साहित्यिक, शिक्षणशास्त्रज्ञ आणि समाजसेवक यांच्या घरात झाला. त्यांचे आजोबा आर्. दिवाण हे मराठवाड्यातून निवडून गेलेले पहिले लोकसभा सदस्य होते, तर मावशी अनुराधा वैद्य मराठीची प्रख्यात लेखिका होती. आई संगीताचा आणि संगीतकारांचा सन्मान करीत असे आणि थोडेफार शास्त्रीय संगीतही जाणतही होती. मुलीचा संगीतातला रस पाहून ती प्रियदर्शिनीला सबंध मराठवाड़ा विभागातले सर्वाधिक प्रख्यात और गुणी गायक पंडित नाथराव नरेलकर यांच्याकडे घेऊन गेली. पुढची दहा वर्षे म्हणजे एम.एस्‌सी पास हीईपर्यंत प्रियदर्शिनी त्यांच्याकडेच शास्त्रोक्त कंठसंगीत शिकली.

सन १९८० च्या दशकात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी एका संगीत समारंभात जयपुर-अत्रौली घराण्याचे मल्लिकार्जुन मन्सूर यांचे गाणे ऐकले आणि त्या मंत्रमुग्ध झाल्या आणि काही वर्षांनंतर त्यांचे पुत्र आणि शिष्य राजशेखर मन्सूर यांना भेटल्या आणि त्यांना गाणे शिकवण्याची विनंती केली. हे शिकणे पुढे दहा वर्षे चालले. त्याच काळात प्रियदर्शिनी कुलकर्णी यांनी पुण्याच्या एसएनडीटी कॉलेजमधून संगीत विषय घेऊन एमए केले. तेथे त्यांना प्रख्यात व्हायोलीन वादक गजाननराव जोशी यांच्या कन्या सुचेता बिडकर ऊर्फ मालूताई शिक्षिका होत्या. प्रियदर्शिनी कुलकर्णी यांना उस्ताद भूरजी खान यांचे पुत्र बाबा अजीजुद्दीन खान और शिष्य मधुसूदन कानिटकर यांच्याकडून त्यांच्या मृत्यूपर्यंत गाण्याचे मार्गदर्शन मिळाले.