प्रा. वि.रा. जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
प्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा
[संपादन]मराठीचे उपक्रमशील आणि विद्यार्थिप्रिय प्राध्यापक कै.श्री.विवेक रामचंद्र जोग यांचे विद्यार्थी एक अभिनव वाचकस्पर्धे आयोजित करीत असतात. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजवणे हा प्रा. वि.रा.जोगांच्या महाविद्यालयीन कार्याचा एक महत्त्वाचा घटक होता.म्हणूनच त्यांचे कोणतेही पार्थिव स्मारक न उभारता वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणे हेच त्यांचे उचित स्मारक होईल या विचाराने या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
स्वरूप
[संपादन]प्रस्तुत स्पर्धा युवागट (१८ ते २५ वर्षे) व प्रौढगट (२६ ते ५५ वर्षे) अशा दोन गटात घेतली जाते व दोन गटांसाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतात. स्पर्धेसाठी कोणताही विवक्षित अभ्यासक्रम नेमलेला नसतो. प्रश्नपत्रिकेत विविधांगी वाचनाची चाचणी घेतली जाते; साहित्यप्रकारांविषयी वैयक्तिक आवडनिवड असते हे लक्षात घेऊन प्रश्नपत्रिकेत पुरेसे पर्यायही देण्यात येतात.
स्पर्धेच्या पहिल्या फेरीत वाचकाच्या वाचनाची व्याप्ती एका लेखी चाचणीने तपासली जाते. शंभर गुणांची लघु-उत्तरी वस्तुनिष्ठ प्रश्नांची प्रश्नपत्रिका स्पर्धकाला एका तासात सोडवायची असते . दुसरी फेरी व अंतिम फेरी प्रश्नमंजूषा ह्या प्रकारच्या व मौखिक असतात, अंतिम फेरीत सामान्य वाचनाच्या चाचणी बरोबरच वाचकाला ज्या प्रांतात विशेष रस आहे अशा प्रांतातील त्याच्या परिपूर्ण, साक्षेपी वाचनाची परीक्षा घेतली जाते.
परीक्षक
[संपादन]लेखी स्पर्धा-फेरीसाठी प्रश्नपत्रिका तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणे तसेच मौखिक परीक्षा घेणे ही जबाबदारीया क्षेत्रातील मान्यवर अभ्यासक पार पाडतात. आजवर अंबरीश मिश्र,रवींद्र लाखे, सतीश काळसेकर, माधुरी पुरंदरे आदि मान्यवरांनी सल्लागार परीक्षक या नात्याने या उपक्रमात सहभाग दिला आहे.
प्रा. वि.रा.जोग स्मृति राज्यस्तरीय मराठी वाचक स्पर्धा - २००९
[संपादन]प्रवेशनोंदणी
[संपादन]प्रवेशनोंदणीसाठी स्पर्धेच्या प्राथमिक फेरीच्या समन्वयकांशी संपर्क केला जातो
बाह्य दुवे
[संपादन]- स्पर्धेविषयी अधिक माहिती Archived 2016-09-22 at the Wayback Machine. संकेतस्थळ
- संपर्कक्रमांक Archived 2016-09-22 at the Wayback Machine.