प्रमोद नवलकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रमोद सच्चिनानंद नवलकर (जन्म : २३ जानेवारी १९३५; - २० नोव्हेंबर २००७) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे नेते होते. ते महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर सतत तीस वर्षे निवडून गेले होते. सन १९९५ ते १९९९ या काळात ते सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते.

मुंबईतील गुंड-मवाली-दादांच्या जागा, वेश्यावस्ती, स्मगलरांची ठिकाण यांना भेटी देऊन नवलकर तेथील साद्यंत माहिती मिळवीत. ह्या माहितीवर आधारलेले 'भटक्याची भ्रमंती' नावाचे साप्ताहिक सदर नवलकर मुंबईच्या 'नवशक्ती' या दैनिकात १९५५ सालापासून लिहीत असत. हे सदर सतत ५२ वर्षे प्रसिद्ध होत होते. वृत्तपत्रातून सर्वात अधिक काळ चालणाऱ्या op-ed (संपादकीयाच्या समोरच्या) स्तंभासाठी हा एक जागतिक विक्रम होता. Guinness Book of World Recordsने याची नोंद घेतली होती. नवलकरांच्या मृत्यूनंतर हे सदर बंद पडले.

प्रमोद नवलकरांनी केलेले लेखन[संपादन]

  • अक्षरदूत (पुस्तक)
  • आनंद (पुस्तक, रविराज प्रकाशन)
  • उमाळा (पुस्तक, रविराज प्रकाशन)
  • आठवणी (पुस्तक, मेघदूत प्रकाशन+विजय प्रकाशन)
  • कल्लोळ (पुस्तक, रविराज मुद्रणालय)
  • गंडेरी (पुस्तक, रविराज मुद्रणालय)
  • जिव्हाळा (पुस्तक, दिलीप प्रकाशन)
  • झपाटलेली लेखणी (पुस्तक, श्रीकल्प प्रकाशन)
  • झपाटा (पुस्तक, दिलीप प्रकाशन)
  • थैमान (पुस्तक, मनोरमा प्रकाशन)
  • धडाका (पुस्तक, मनोरमा प्रकाशन)
  • धुमाकूळ (पुस्तक, वसंत बुक स्टाॅल)
  • निशाण (पुस्तक)
  • पायपीट (पुस्तक)
  • प्रहार (पुस्तक, वसंत बुक स्टाॅल)
  • बेधडक (पुस्तक, मनोरमा प्रकाशन, वसंत बुक स्टाॅल)
  • भटक्या (पुस्तक, )
  • भ्रमणगाथा (पुस्तक)
  • मनोवेध (पुस्तक, रविराज प्रकाशन : 'मार्मिक'मधील निवडक आठवणींचा संग्रह/लघुनिबंध संग्रह)
  • मुंबई मोहनगरी (पुस्तक)
  • विरंगुळा (पुस्तक, रविराज प्रकाशन)
  • वृंदावन (पुस्तक, रविराज प्रकाशन)
  • संवेदना ('मार्मिक'मधील निवडक आठवणींचे पुस्तक, रविराज मुद्रणालय)
  • सहज ((पुस्तक, रविराज प्रकाशन
  • सावली (पुस्तक, रविराज मुद्रणालय)
  • सुरूंग (पुस्तक, मनोरमा प्रकाशन)
  • हिसका (पुस्तक, दिलीप प्रकाशन)


(अपूर्ण)