प्रभूराव नरसिंगराव डोईजोडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रभुराव नरसिंगराव डोईजोडे यांचा जन्म इ. स. ३ऑगस्ट १९२६ रोजी उदगीर येथे झाला. त्याच्या आईचे नाव यशोदाबाई आणि वडिलांचे नाव नरसिंगराव हे होते. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी मराठी इयत्ता चौथी पास झाले. यांना शिक्षणाची जास्त आवड नव्हती यामुळे यांनी चौथी नंतर शाळेत जाणे बंद केले.शिक्षण सोडल्यावर त्यांनी कपड्याच्या दुकानात काम करत होते. आणि तसेच ते आर्य समाजाच्या कार्यक्रमाला जात असत. परत दुकानात कपड्यांना बटण लावण्याचे काम करत होते.

भाई श्यामलाल यांची भाषणे ऐकुन त्यांचे मन क्रांतिकारचे बनले. त्याकाळी निजाम राज्यात राजाची चालत होती. मुस्लिम हे हिंदु लोकांशी अरेरावीची भाषा करीत होते. असं जिव मुठीत घेऊन किती दिवस जगायचे?. असा विचार सर्व लोकांच्या मनात येत होते. पोलीसही निजामधार्जीने होते. यामुळे मजबुरीने जीवन जगावे लागले.

आर्यसमाजाच्या सहवासात[संपादन]

प्रभुराव वयाच्या 10 व्या वर्षी आर्य समाजाचे सदस्य बनले होते. सन १९३६ पासुन ते रोज शाखेत जाऊन व्यायाम, कुस्ती, भाले, बरचे, काठी चालवणे यांचे प्रशिक्षण घेत होते. प्रभुरावांना अशी गोष्टीत खुप आवड होती. आर्यसमाजाचे नेते बन्सीलालजी आणि शामलालजीच्या संपकात सतत राहत असल्यामुळे देशप्रेमाचे धडे त्यांना मिळत होते. ऐके दिवशी दुकानाच्या समोरून आंदोलनाचा मोर्चा जात असे. त्यात प्रभुरावजी सहभागी होत हाती झेंडा घेतला आणि पुढे नारे देत निघाले.

मुक्तिसंग्राम लढ्यात सक्रीय सहभाग आणि कारावास[संपादन]

ज्या आंदोलनात प्रभूराव सहभागी झाले होते त्या आंदोलकांना निजामी पोलिसांनी अटक केली. तेथून त्यांना उदगीरच्या जेलमध्ये नेण्यात आले. कोर्टाने त्यांना दिड वर्षाची शिक्षा आणि शंभर रुपये दंड ठोकावला. नंतर त्यांना बिदरच्या जेलमध्ये पाठविले. जेलमध्ये दिवसभर कामे करीत राहावे लागले. त्यासोबत विहिरीचे पाणी काढणे, दळण करणे, दगड वेचणे ही सुधा कामे जेलमध्ये करावी लागतात. कामात कामचोर झाल्यास मार देत होते. यांना बिदरच्या जेलमध्ये एक महिना ठेवल्यानंतर त्यांना गुलबगर्याच्या सेंट्रल जेलमध्ये जवळपास दहा महिने ठेवले होते. प्रभुराव जेलमध्ये का चगुंडया लावण्याचे काम करीत होते. जेवायला तिथे पोळी - डाळ द्यायचे. सकाळी दहा वाजता आणि संध्याकाळी चार वाजता जेवण देत होते.

जेलमध्ये असतांना त्यांना बाहेरच्या बातम्या कधी कधी कळत असत. एका दिवशी अशी बातमी आली की नथुराम गोडसेने महात्मा गांधींना गोळी घालून त्यांची हत्या केली. हे ऐकून प्रभूराव आणि त्यांच्या सोबत असलेले कैद्यानी एक दिवस उपोषण केले. यानंतर एका महिन्याने रजाकार लोकांनी जेलमध्ये येऊन या कैद्यांना मारायला सुरू केले. सर्वकैद्यानी एकवटून, ताट, वाटी आणि ग्लास फेकून मारायला सुरुवात केली. ही बातमी जेलरने पोलीस अधिकाऱ्याला कळविली. अधिकाऱ्यांनी मिलट्री बोलावली. मिलट्री येणार हे कळताच रझाकार पळून गेले. निजामाने भारतात विलीन होण्यास नकार दिला होता. हैद्राबाद संस्थानातील निजाम विरोधी नेत्यांनी दिल्लीला जाऊन पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल यांच्याशी चर्चा करून हैद्राबाद मुक्तीसाठी विनंती केली.

मराठवाडा मुक्त झाला[संपादन]

त्स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस अॅकशनद्वारे सशस्त्र सैनिक हैद्राबादमध्ये घुसविले निजाम शरण आला व हैद्राबाद राज्य निजामच्या तावडीतून १७ सप्टेंबर १९४८ रोजी मुक्त झाले. जेलमधील सर्व कैद्याना मुक्त केले गेले. प्रभूराव व इतर लोकांना गुलबर्गा जेलमधून बिदर पर्यन्त आणून सोडले तिथून सर्वजण आंनदाणे आपापल्या घरी गेले.

जेलमधून सुटका[संपादन]

प्रभुरावांनी जेलमधून सुटका झाल्यानंतर कपड्याचे छोटेसे दुकान उदगीर येथे सुरू केले. घर परिवाराकडे ते लक्ष देऊ लागले. दि. 29-8-1969 मध्ये प्रभुरावांना सन्मानपत्र देण्यात आले आणि 15-8-1962 रोजी इंदिरा गांधीच्या हस्ते ताम्रपत्र देण्यात आले.

ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे सदस्य होते. महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात त्यांच्या सत्कार करून शाल, श्रीफळ आणि चांदीचा शिक्का देऊन सन्मानित करण्यात आले.

संदर्भ[संपादन]

https://latur.gov.in