प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन
Appearance
प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन हे बहुजन विकास आघाडीतर्फे भरविले जात असते.
सत्यशोधक छत्रपती विचार आणि जागृती मंचाच्या वतीने भरविले जाणारे प्रबोधन साहित्य संमेलन हे वेगळे संमेलन आहे.
- १ले प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३-२४ मार्च २०१३रोजी भरले होते. संमेलनाध्यक्ष संपत जाधव होते. या संमेलनात उत्तम बंडू तुपे यांना साहित्यगौरव हा आणि मोहन अडसूळ यांना कलागौरव हा पुरस्कार देण्यात आला.
- २रे प्रबोधनकार ठाकरे विचार साहित्य संमेलन पुणे शहरात २३ फेब्रुवारी २०१४ला भरले होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक प्राचार्य रा.रं. बोराडे होते.. या संमेलनात कवी विठ्ठल वाघयांना साहित्यगौरव पुरस्कार आणि चित्रकार रविमुकुल यांना कलागौरव पुरस्कार देण्यात आला.