प्रफुल्ला डहाणूकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रफुल्ला दिलीप डहाणूकर, माहेरच्या प्रफुल्ला सुब्राय जोशी, (जन्म : बांदोडा-गोवा, १ जानेवारी, इ.स. १९३४; मृत्यू : मुंबई, १ मार्च, इ.स. २०१४[१] ) या एक मराठी चित्रकार होत्या. बॉम्बे आर्ट सोसायटी, आर्ट सोसायटी ऑफ इंडिया, आर्टिस्ट्‍स सेंटर, जहांगीर आर्ट गॅलरी, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, गोवा कला अकादमी आदी अनेक कलासंस्थांच्या त्या अध्वर्यू होत्या.

प्रफुल्लाबाईंचे वडील सुब्राय अनंत जोशी, यांचा वाहतुकीचा व वाहनांचा व्यवसाय होता. प्रफुल्ला पाच वर्षांची असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईत आले. प्रफुल्लाचे शालेय शिक्षण मुंबईतच झाले. शाळेच्या मासिकासाठी तिने काढलेली चित्रे बघून वडिलांनी तिला कलाशिक्षणासाठी ’जे.जे.स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दाखल केले.


इ.स. १९५५मध्ये जेजेमधून सुवर्णपदक मिळवून कलापदवीधर झाल्यानंतर प्रफुल्ला जोशी चित्रकलेच्या अधिक शिक्षणासाठी फ्रान्स सरकारची शिष्यवृत्ती मिळवून इ.स. १९६१मध्ये पॅरिसला गेल्या, आणि शिक्षण पूर्ण करून परत भारतात आल्या. त्या भित्तिचित्रांमध्ये खास प्रवीण होत्या. भारतामध्ये अशा चित्रांसाठी त्यांनीच पहिल्यांदा रोलरचा वापर सुरू केला.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन" (मराठी मजकूर). सकाळ. २ मार्च २०१४. २४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले. (अपूर्ण)