प्रदोषचंद्र मित्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रदोषचंद्र मित्तर
लेखक सत्यजित रे
माहिती
टोपणनाव फेलूदा
सहकारी तोपशे, लालमोहन गांगुली
व्यवसाय सत्यान्वेषी
राष्ट्रीयत्व बंगाली, भारतीय
तळटिपा

प्रदोषचंद्र मित्र ऊर्फ फेलूदा (बंगाली: প্রদোষচন্দ্র মিত্র, ফেলুদা ; ) हा सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या कादंबरी मालिकेचा मुख्य काल्पनिक नायक होता.

सुरुवात[संपादन]

सत्यजित रायांच्या "फेलूदार ग्योंईंदागिरी" (फेलूदाची हेरगिरी) या लघुकथेतून तो इ.स. १९६५ साली पहिल्यांदा वाचकांसमोर अवतीर्ण झाला. सत्यजित रायांचे आजोबा, उपेंद्रकुमार राय यांनी सुरू केलेल्या संदेश या बालकुमारांच्या मासिकामधे ही कथा प्रकाशित झाली.

व्यक्तिरेखा[संपादन]

कथांमधे वर्णल्याप्रमाणे, फेलूदाचे वय साधारण २७ वर्षे आहे, त्याची उंची ६ फूट २ इंच असून बांधा मजबूत आहे. दणकट शरीर असून त्याला मार्शल आर्टही येतात. असे शरीर असूनही तो प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या बुद्धीचा जास्त वापर करतो. त्याच्याजवळ ३२ कोल्ट रिव्हॅल्व्हर आहे ज्याचा अगदी क्वचितच वापर झालेला दाखवला आहे. आणि त्याने कोणालाही या शस्त्राने मारलेले नाही. मात्र सत्यजित रायांनी बनवलेल्या चित्रपटांमध्ये फेलूदाने बऱ्याचदा हे शस्त्र वापरले आहे. फेलूदाला अगदी उत्तम वेषांतर करता येते.

मराठीतील अनुवाद[संपादन]

अशोक जैन यांनी फेलूदावरील १२ कादंबऱ्यांचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे. ही अनुवादित पुस्तके रोहन प्रकाशनाने छापली आहेत.

बाह्य दुवे[संपादन]