लालमोहन गांगुली
लालमोहन गांगुली | |
---|---|
फेलूदा या मालिकेतील पात्र | |
कारण |
सोनेरी किल्ला या गोष्टीमध्ये रेल्वेत भेट व मैत्री |
लेखक |
सत्यजित रे |
माहिती | |
टोपणनाव | जटायू, लालमोहनबाबू (मराठी) |
लिंग | पुरुष |
व्यवसाय | बालसाहसकथा लेखक |
राष्ट्रीयत्व | बंगाली, भारतीय |
तळटिपा |
लालमोहन गांगुली हे सत्यजित राय यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या 'फेलूदा (बंगाली: প্রদোষচন্দ্র মিত্র, ফেলুদা ; ) कादंबरीमालिकेच्या मुख्य नायकाचे एक सहकारी आहेत.
सुरुवात
[संपादन]सत्यजित रायांच्या "फेलूदार ग्योंईंदागिरी" (फेलूदाची हेरगिरी) या लघुकथेतून तो इ.स. १९६५ साली पहिल्यांदा वाचकांसमोर अवतीर्ण झाला. सत्यजित रायांचे आजोबा, उपेंद्रकुमार राय यांनी सुरू केलेल्या संदेश या बालकुमारांच्या मासिकामधे ही कथा प्रकाशित झाली. लालमोहन गांगुली उर्फ लालमोहनबाबू या कथा मालिकांत "शोनार केल्ला", मराठीत "सोनेरी किल्ला", कथेत अवतीर्ण होतात. लालमोहनबाबू या कथामालिकांतील एक विनोदी पात्र आहेत.
व्यक्तिरेखा
[संपादन]कथांमधे वर्णल्याप्रमाणे, लालमोहनबाबूंचे मध्यम वयाचे आहेत. त्यांच्या डोक्यावरचे बरेच केस गळलेले आहेत. ते ठेंगणे व काळेसावळे आहेत. स्वभावाला ते फार भिडस्त आहेत. फार चटकन उत्तेजित होतात, मात्र फार भित्रे आहेत. त्याची लगेचच घाबवरगुंडी उडते. लालमोहनबाबूंना कोणीही चटकन प्रभावीत करू शकते.
लालमोहनबाबू "जटायू"या टोपण नावाने लिहीतात. ते स्वतःला फार मोठा लेखक समजतात; त्यांची पुस्तकेही भरपूर खपतात, पण फेलूदाच्या संभाषणांतून कळते की त्या पुस्तकांत खूप चूका आहेत. लालमोहनबाबू थोड्यानी चुकीच्या ज्ञानावर आधारीत पुस्तके लिहीतात. काही काळानंतर ते चारचाकी गाडी घ्यावी इतके श्रीमंत होतात.
"शोनार केल्ला", मराठीत "सोनेरी किल्ला", कथेमधे फेलूदा आणि तोपेश राजस्थानला जात असताना आगगाडीमधे त्यांची लालमोहनबाबूंसोबत भेट होते. सोनेरी किल्ला ही या त्रयीची पहिली साहसकथा आहे. "गणेशाचे गौडबंगाल" (जोय बाबा फेलूनाथ) मधे कथेतील खलनायक, मगनलाल मेघराज, फेलूदाला जरब बसवण्याकरीता लालमोहनबाबूंवर चाकूफेकीचा खेळ करवून घेतो. खेळ संपताच लालमोहनबाबू बेशुद्ध होऊन पडतात. फेलूदा मग संतापून या घटनेचा सूड उगवण्याकरीता जास्त जोरात काम सुरू करतो.
लालमोहनबाबू हे नाव अशोक जैन यांनी केलेल्या फेलूदाच्या मराठीअनुवादांत दिसते.
इतर
[संपादन]सत्यजित राय यांच्या फेलूदावरील चित्रपटांत संतोष दत्त या बंगाली अभिनेत्याने लालमोहन गांगुलींची भूमिका बजावली आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- "चाहत्यांचे संकेतस्थळ" (इंग्लिश व बंगाली भाषेत). 2010-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-02-27 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)