प्रतिलाभ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रतिलाभ म्हणजे एखाद्या गोष्टीच्या अथवा फायद्याच्या बदल्यात उपलब्ध करून दिलेला अनुकूल लाभ, अनुग्रह, कृपेची किंवा फायद्याची कृती. इंग्रजी भाषेत यास quid pro quo असे म्हणतात. वाणिज्य आणि न्यायशास्त्र व्यवहारात हा शब्द वापरला जातो.

भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये संबंधित व्यक्तीने दिलेल्या धनाच्या अथवा विवक्षित फायद्याच्या बदल्यात नेमका कोणता फायदा संबंधित व्यक्तीस करून दिला गेला याचा कार्यकारण संबंध पाहिला जातो; त्यावेळी त्यास प्रतिलाभ म्हणतात.