प्रकाश मोहाडीकर
Appearance
प्रकाशभाई मोहाडीकर (लक्षमण मोहाडीकर) हे एक ज्येष्ठ क्रांतिकारक आणि साने गुरुजींचे मानसपुत्र होते. प्रकाशभाईंनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामात हिरारीने भाग घेतला होता. त्यांनी बॉंम्ब बनविण्याची विद्या सेनापती बापट यांच्याकडून शिकून इतर अनेक क्रांतिकारकांना शिकविली होती. दादर(मुंबई)मध्ये साने गुरुजी विद्यालय नावाची शाळा त्यांनी स्थापन केली. प्रकाशभाईनी साने गुरुजी कथा मालेच्या माध्यमातून गुरुजींचे विचारधन संपूर्ण भारतभर पसरविले.