प्रकाशाचे गाणे (पुस्तक)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रकाशाचे गाणे हे स्त्रीविषयक मराठी पुस्तक आहे. अरुणा ढेरे या पुस्तकाच्या लेखिका आहेत.

विषय[संपादन]

प्रकाशाचे गाणे हे परिचयात्मक पुस्तक आहे. १९ व्या आणि २० व्या शतकातील काही निवडक महिलांचा आणि त्यांच्या कार्याचा परिचय या पुस्तकात करून देण्यात आला आहे. या दोन्ही शतकात इंग्रजांचे भरावे असलेले राज्य,स्वातंत्र मिळविण्यासाठी भारतीयांनी दिलेला लढा, स्त्री शिक्षणाला असलेली बंदी, महर्षी कर्वे , सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना स्त्री शिक्षणासाठी केलेले प्रयत्न, विधवा स्त्रियांचे पुनर्विवाह, ख्रिस्ती धर्माचा तत्कालीन समाजावर पडलेला प्रभाव अशी पार्शवभूमी असलेल्या भारतात होऊन गेलेल्या स्त्रियांनी आपल्या आठवणी ग्रथित केलेल्या आहेत.

सदर पुस्तकात ज्या स्त्रियांच्याविषयी माहिती मिळते त्यातील ९०% महिला या तत्कालीन गृहिणी आहेत. काही महिला राजकीय क्षेत्रात काम केलेल्या आहेत. काही महिला या क्रांतीकारकांच्या कुटुंबातील सदस्या आहेत. त्यामुळे या पुस्तकात तत्कालीन कुटुंबाजीवन, कौटुंबिक चालीरीती यांची माहिती मिळते. विविध सण, कुलाचार, नातेसंबंध तसेच कुटुंबातील स्त्रियांचे स्थान याविषयी उल्लेख वाचायला मिळतात.

तपशीलात वर्णन[संपादन]

सदर पुस्तकात पुढील स्त्रियांच्याविषयी सारांशरूपात माहिती मिळते-

(महिलेचे नाव- कार्य- संबंधित महिलेने लिहिलेले पुस्तक या क्रमाने)

१. यशोदाबाई जोशी-गृहिणी ( आमचा जीवनप्रवास)

२. यशोदाबाई भट-सामाजिक व राजकीय कार्यकर्त्या( महाराष्ट्राची वीरांगना 'मा')

३. जानकीबाई फडणीस-गृहिणी (स्मरणमाला)

४. पार्वतीबाई शिंदे-गृहिणी

५. सुंदराबाई पवार-ख्रिस्ती धर्मोपदेशिका (अक्का)

६. सत्यभामाबाई सुखात्मे-गृहिणी (गेले ते दिवस)

७. गोदुमाई खरे-स्वातंत्र्य चळवळीत सहभाग (आमच्या गोदुमाई)

८. अहल्याबाई भांडारकर-शिक्षिका आणि समाजसुधारक (श्रीमती अहल्याबाई भांडारकर स्मृतीग्रंथ)

९. सुंदराबाई तळपदे-शैक्षणिक क्षेत्रात योगदान (शारदेच्या चरणी)

१०. सीताबाई आणिगेरी- शिक्षिका आणि कर्वे महिला आश्रमाच्या कार्यकर्त्या (अंधारातून प्रकाशाकडे)

११. जानकीबाई आपटे-राष्ट्रीय चळवळीत सहभाग (कर्मयोगी जानकीबाई आपटे)

१२. रमाबाई केदार-गृहिणी (वाचलेले मणी)

१३. राधाबाई आपटे-सामाजिक कार्यात सहभाग (माझी वाटचाल)

१४. राधाबाई शेवडे- गृहिणी (जीवनगाथा)

१५. लक्ष्मीबाई स्वारकर- स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या धाकट्या वहिनी (हरिदिनी)

१६. मालिनीबाई भाटवडेकर-गृहिणी (रघुनाथ-मालिनी)

१७. दुर्गाबाई देशमुख-सामाजिक कार्यकर्त्या, वकील (आमची कथा)

१८. विनोदिनी गायकवाड- महिला डॉक्टर (यशस्विनी)

१९. चारुशीलाबाई बापट-गृहिणी (स्मृतिपुष्पे)

२०. सुशीलाबाई आठवले-गृहिणी, कर्वे स्त्री संस्थेत योगदान (आंब्याचा टाळा)

२१. कमलताई भागवत-स्वातंत्रलढ्यात सहभाग (न संपलेली वाट)

२२. मथुताई आठल्ये-महिला डॉक्टर, समाजसेवा ( मागे वळून)

२३. अनसूयाबाई काळे-स्वातंत्र्यकार्यात सहभाग (अनसूयाबाई आणि मी)

२४. सुलोचनाबाई सोमण-महिला डॉक्टर (अनुभव)

२५. मित्रायणी- गोव्यातील कलावंतीण स्त्रीच्या मुलीची संघर्ष कथा ( गृहलक्ष्मी मासिक मार्च १९२९)

अन्य तपशील[संपादन]

पुस्तकाचे प्रकाशन वर्ष- २४ जुलै १९९

प्रकाशक-सुरेश एजन्सी

पृष्ठसंसख्या-१६३